अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यानुसार अखेर फडणवीसांनी आज बॉम्ब फोडलाय. मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल
देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 1:15 PM

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्या आरोपावरुन दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यानुसार अखेर फडणवीसांनी आज बॉम्ब फोडलाय. मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. (Devendra Fadnavis allegations on Minister Nawab Malik over Kurla land purchase)

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली होती. तसंच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे हे होते. तसंच त्यांना या स्फोटाप्रकरणी संपूर्ण माहिती होती. दुसरे व्यक्ती सलीम पटेल. हा सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत फोटो आला. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. हा सलीम पटेल म्हणजे हसिना पारकरचा प्रमुख माणूस. त्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायच्या, अशी माहिती फडणवीसांनी दिलीय.

‘कुर्ल्यातील प्राईम लोकेशनची जमिनीची कवडीच्या दरात खरेदी’

कुर्ल्यात एलबीएस रोडवर गोवावाल्याची जागा होती. सलीम पटेलने त्याची पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली. त्या जमीनीचा दुसरा एक भाग शाह वली खान यांच्या नावाने आहे. या दोघांनी जवळजवळ तीन एकरची जागा सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली. या कंपनीच्या वतीनं त्याच्यावर सही केली ती फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी मलिक यांच्या कुटुंबाकडे आहे. स्वत: मलिक काही काळ या कंपनीवर संचालक राहिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे सॉलिडसला ही जागा केवळ 30 लाखात विकली गेलीय. मलिक या कंपनीत 2019 पर्यंत होते. मंत्रि झाल्यावर त्यांनी त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. ही जमीन त्यांनी खरेदी केली तेव्हा रेट 2 हजार स्क्वेअर फुटने केली गेली. अंडरवर्ल्ड करुन खरेदी केलेली जमीन 30 लाखात खरेदी केली गेली. पेमेंट झालं 20 लाख. सलीम पटेलच्या अकाऊंटवर हे 15 लाख रुपये गेले. उर्वरित रक्कम शाह वली खानला मिळाले.

नेमका व्यवहार काय आणि कसा?

20 लाखात एलबीएस रोडवर 3 एकर जमीन खरेदी झाली. पॉवर ऑफ अर्टनीमध्ये टेनंट वेगळा, रजिस्ट्रीवेळी वेगळा, किंमत कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. याची किंमत 3.50 कोटी दाखवली. रजिस्ट्री कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. रेडी रेकनर 8500 रु. स्वे.मीटर मार्केट रेट 2 स्वेअर फीट, खरेदी झाली 25 रुपये स्वे.फूटने आणि स्टँप ड्युटी भरली 15 रुपये स्वेअर फूटने, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून व्यवहार झाला नाही ना?

2003 मध्ये व्यवहार 2005 ला संपला तेव्हाम मलिक मंत्री होते. तेव्हा त्यांना माहिती नव्हतं का सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? आणि असं काय होतं की एवढी महागडी जमीन तुम्हाला 20 लाखात मिळाली? त्याला कारण या गुन्हेगारांवर टाडा लागला होता. टाडा कायद्यानुसार गुन्हेगारांची सगळी प्रॉपर्टी जप्त होते. त्यामुळेच यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून तर हा व्यवहार झाला नाही ना. यात सरळ अंडरवर्ल्डसोबत संबंध दिसून येतो, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.

फडणवीस पवारांनाही पुरावे देणार

1993 मध्ये आम्ही लोकांचे चिंधडे उडताना पाहिले. हे ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. ही एकच नाही अशा 5 प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत. त्यातील 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल असल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार आहे. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनाही हे पुरावे देणार आहे. त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.

इतर बातम्या :

तासाभरापूर्वी संजय राऊत भेटले, आता पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला, मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं, हालचालींना वेग

मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ! नवाब मलिक यांचं सूचक ट्विट, पत्रकार परिषदेत कोणता धमाका?

Devendra Fadnavis allegations on Minister Nawab Malik over Kurla land purchase

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.