AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवसाला पत्नीने दोन ड्रेस शिवायला दिले, उरलेल्या कपड्यातून टेलरने मास्क बनवले, गुलाबरावांच्या मॅचिंग मास्कचं रहस्य

मंत्री गुलाबराव पाटील सध्या ड्रेसवर मॅचिंग 'मास्क' वापरत आहेत. गुलाबरावांचा हा थाट नामनिराळा ठरला आहे. (Gulabrao Patil matching mask)

वाढदिवसाला पत्नीने दोन ड्रेस शिवायला दिले, उरलेल्या कपड्यातून टेलरने मास्क बनवले, गुलाबरावांच्या मॅचिंग मास्कचं रहस्य
| Updated on: Jun 10, 2020 | 1:23 PM
Share

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे ‘खान्देशची मुलुख मैदान तोफ’ म्हणून परिचित आहेत. मात्र, सध्या ते एका वेगळ्याच विषयावरुन चर्चेत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर या मंत्री महोदयांचा थाटच निराळा आहे. ते सध्या ड्रेसवर मॅचिंग ‘मास्क’ वापरत आहेत. गुलाबरावांचा हा थाट नामनिराळा ठरला आहे. (Gulabrao Patil matching mask)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीच्या निमित्ताने गुलाबराव पाटील मंगळवारी सायंकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसच्या रंगाचेच मास्क तोंडाला लावले होते. त्यांच्या मास्कने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रत्येक जण कुतूहलाने त्यांना याबाबतीत विचारणा करत होता. मात्र, ते केवळ स्मितहास्य करत आपला प्रतिसाद देताना पाहायला मिळाले.

या विषयाबाबत खुद्द पत्रकारांनी विचारणा केलो असता गुलाबराव पाटील यांनी मॅचिंग मास्कचे रहस्य सांगितले. 5 जून रोजी गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी दोन नवे ड्रेस शिवण्यासाठी टेलरकडे दिले होते. दोन्ही ड्रेस शिवून झाल्यावर उरलेल्या कापडाचे त्या टेलरने तोंडाला बांधण्यासाठी ट्रिपल लेअरचे मास्क शिवले. हे मास्क ड्रेसवर मॅचिंग असल्याने गुलाबराव पाटील ते वापरत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधणे गरजेचे आहे. हाच संदेश त्या टेलरने दिल्याचे सांगत गुलाबराव पाटील यांनी त्याचे यावेळी आभारही मानले.

(Gulabrao Patil matching mask)

संबंधित बातम्या 

कोरोना संकट गेल्यावर मैदानात या आणि सरकार पाडून दाखवा, गुलाबराव पाटलांचं भाजपला आव्हान  

आमचं उष्टं कुणी खाऊ नका, गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक सल्ला 

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.