पंकजांची जादूची कांडी जोमात, फुलचंद कराडांचाही भाजपला पाठिंबा

पंकजांची जादूची कांडी जोमात, फुलचंद कराडांचाही भाजपला पाठिंबा

बीड : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघतोय. निवडणुकीच्या तोंडावर इन आणि आऊटची गर्दी सुरु असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना एक दिलासा मिळाला आहे. गोपीनाथ मुंडेंचे खंदेसमर्थक फुलचंद कराड यांनी काम शिवसंग्राम सोबतच करेन परंतु लोकसभा निवडणुकीत डॉ प्रितम मुंडेंना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.  परळीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पाठिंबा जाहीर केल्याने पंकजा मुंडे यांचं पारडं जड झालं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष संघटनांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. कोणी विकासावर तर कोणी बेरोजगारीवर एकमेकांवर भारी पडत आहेत. एवढेच नाही तर नाराजीवर मोठी भर आहे. पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामला खिंडार पाडल्यानंतर नाराज विनायक मेटे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदेसमर्थक आणि भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांना धक्का देण्याचे काम केले होते. यापुढे राज्यात शिवसंग्राम आणि भगवान सेना एकत्रित काम करतील असा दोघांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे पंकजा मुंडेंसमोर एक आव्हान उभे टाकले होते. अखेर जयदत्त क्षीरसागर यांनीही भाजपशी जवळीक केल्याने नाराज मेटे यांनी जिल्ह्यात भाजपला नव्हे, तर राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेटे यांचा समाचार घेतला होता.

भगवान सेनेचा कार्यकर्ता मेळावा आज घेण्यात आला होता. मेळाव्यात फुलचंद कराड राष्ट्रवादीला पाठिंबा देतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. शिवसंग्राम आणि भगवान सेना एकत्रित काम करतील, परंतू बीड लोकसभा निवडणुकीत डॉ प्रितम मुंडे यांना पाठिंबा जाहीर करत निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करू असा संकल्प फुलचंद कराड यांनी  केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *