राज ठाकरेंच्या पहिल्या 6 सभांच्या तारखा, ठिकाणं ठरली!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभरात सभा घेऊन, भाजपप्रणित केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनजागृती करणार आहेत. राज ठाकरे यांनी यासंदर्भात गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कातील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभा स्थळांची आणि तारखांची निश्चिती झाली आहे. भाजपवाले म्हणतात, राष्ट्रवादी-काँग्रेस मला वापरुन घेतायत, …

raj thackeray, राज ठाकरेंच्या पहिल्या 6 सभांच्या तारखा, ठिकाणं ठरली!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभरात सभा घेऊन, भाजपप्रणित केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनजागृती करणार आहेत. राज ठाकरे यांनी यासंदर्भात गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कातील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभा स्थळांची आणि तारखांची निश्चिती झाली आहे.

भाजपवाले म्हणतात, राष्ट्रवादी-काँग्रेस मला वापरुन घेतायत, पण मी वेडा नाही : राज ठाकरे

12 एप्रिलपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात म्हणजे नांदेडमध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. 12 एप्रिल ते 19 एप्रिल असा राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचा पहिला टप्पा असेल.

राज ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभा कुठे आणि कधी होणार?

 • राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील जाहीर सभांचा अधिकृत कार्यक्रम.

  1)  12 एप्रिल, सायंकाळी 06 वाजता, नवीन मुंडा मैदान, नांदेड.

  2) 15 एप्रिल, सायंकाळी 06 वाजता, कर्णिक नगर क्रीडांगण, सोलापूर.

  3) 16 एप्रिल, सायंकाळी 06 वाजता, यशोलक्ष्मी मंगल कार्यालय शेजारील मैदान, कोल्हापूर नवीन नाका, इचलकरंजी.

  4) 17 एप्रिल, सायंकाळी 06 वाजता, सातारा.

  5) 18 एप्रिल, सायंकाळी 06 वाजता, खडकवासला

  6) 19 एप्रिल, सायंकाळी 06 वाजता, गोरेगाव (महाड )रायगड.

या सर्व सभांचे आयोजन मनसेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेही स्थानिक पदाधिकारी मनसेच्या व्यासपीठावर नसतील.

संबंधित बातम्या :

विनोद तावडेंना मनसे नेते संदीप देशपांडेंचं ओपन चॅलेंज

…अन्यथा राज ठाकरेंना पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत, तावडेंची जहरी टीका

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *