AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंनीच मुलाचा खून केल्याचं लोढा बरळला होता, गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. आता महाजन यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन खडसे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

खडसेंनीच मुलाचा खून केल्याचं लोढा बरळला होता, गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा
| Updated on: Jul 21, 2025 | 7:24 PM
Share

Girish Mahajan Vs Eknath Khadse : हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढा या व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रफुल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे संबंध आहेत, असा दावा केलाय. तसेच या हनी ट्रॅप प्रकरणाची एसआयटी चौकशी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. असे असतानाच आता गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या मुलाच्या निधनाबाबत खळबळजनक विधान केले आहे.

एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत मोठा दावा

खडसे यांनी प्रफुल लोढा याचे नाव घेऊन गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर महाजन यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी प्रफुल लोढा याचेच नाव घेत एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत मोठा दावा केलाय. खडसे यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांना सर्वदूर अपयश आलेलं आहे. ते सत्तेपासून दूर फेकले गेले आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी लोटांगण घातले. मात्र त्यांना पक्षात कोणीही घेतले नाही, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.

निखिल खडसे यांच्या मृत्यूप्रकरणाचीही…

सर्व आजारपण आणि सर्वदूर अपयश यामुळे हा माणूस द्वेष भावनेने पछाडलेला आहे. थोडा वेळ द्याल तर मी एकनाथ खडसे यांच्यासोबत च प्रफुल लोढा यांचेसुद्धा फोटो दाखवतो. त्यामुळे एकनाथ खडसे यांची मानसिकता खराबच झालेली आहे, असा हल्लाबोल महाजन यांनी केला. निखिल खडसे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी हाच प्रफुल लोढा बोलला होता. काय काय बरगळला होता. आता खडसे म्हणतात प्रफुल लोढा यांची एसआयटी चौकशी करा. असे असेल तर निखिल खडसे यांच्या मृत्यूप्रकरणाचीही चौकशीचीही प्रफुल लोढा याने मागणी केली होता, असा संदर्भ महाजन यांनी दिला.

खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला म्हणून असं…

तसेच, एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे समोर आलं पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला म्हणून असं याच लोढा यांने सांगितलेलं आहे, असा मोठा आणि गंभीर गौप्यस्फोट महाजन यांनी केला.त्यावेळी मी एकनाथ खडसे यांच्यासोबतच राहत होतो. मला त्याबद्दल बोलायचं नाही. मी त्या लेव्हलचा माणूस नाही. पण त्यांनी बोलताना थोडं तारतम्य बाळागलं पाहिजे, असा सल्लाही पुढे गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला.

हिंमत असेल तर चौकशी करा- खडसे

तर महाजन यांच्या या गौप्यस्फोटानंतर नेहमी माझ्या मुलाच्या मृत्यूवरून कसले इशारे देता. मी कसल्याही चौकशीला समोरे जायला तयार. दम असेल तर पुन्हा चौकशी करा, असे खुले आव्हानच एकनाथ खडसे यांनी महाजन यांना दिले आहे. मुलगा गेल्याचं दुःख मलाही आहे. त्यात घातपात असा काहीही नव्हता, असं त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलेलं आहे.मग प्रत्येक वेळी मुलाच्या मृत्यूवरून कसली विधान करताय, असा थेट सवाल खडसे यांनी महाजनांना केला. मलाही तुमच्या घरातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मीही बोलू शकतो, असा इशाराही खडसे यांनी महाजन यांना दिला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.