राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना! – गिरीश महाजन

एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मागणी केली आहे

राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना! - गिरीश महाजन
. हा कोरोनाचा नेमका कोणता प्रकार आहे, यासाठी शास्त्रज्ञांना सांगून संशोधन करायला सांगा. त्याचा नायनाट करून तो पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, असे मी सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले.


जळगाव : भाजपला रामराम ठोकून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमय झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मागणी केली आहे. हा नेमका कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करावं अशी मागणीच गिरीश महाजन यांनी केली आहे. महाजन यांच्या अशाप्रकारच्या मागणीमुळे जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय खडसे विरुद्ध महाजन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.(Girish Mahajan criticizes Eknath Khadse)

“राज्यात कोरोना आहे. पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकरचा कोरोना आहे. एका व्यक्तीला 3 – 3 वेळा त्याची लागण झाली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीन वेळा कोरोनाची लागण होत आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी, असं मी म्हणत नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे”, अशी उपहासात्मक टिप्पणी गिरीश महाजन यांनी केली आहे.

एकनाथ खडसे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोना सदृश्य लक्षणे आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या सूनबाईक खासदार रक्षा खडसे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती 18 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास समोर आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

“माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असं खडसे यांनी सांगितलं आहे.

एकनाथ खडसे यांना सर्वात आधी 19 नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत 6 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल”, असं एकनाथ खडसे ट्विटरवर म्हणाले होते. त्यानंतर उपचार घेऊन ते बरे झाले होते.

संबंधित बातम्या :

खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

Girish Mahajan criticizes Eknath Khadse

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI