AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला खूप वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं पण…, महाजनांचा खडसेंना खोचक टोला

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

तुम्हाला खूप वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं पण..., महाजनांचा खडसेंना खोचक टोला
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 14, 2022 | 11:08 AM
Share

जळगाव :  भाजप (BJP) नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा केवळ वाणी, ब्रह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हटलं महाजनांनी ?

गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावरून त्यांना जोरदार टोला लगावला आहे. एकनाथ खडसे जे बोलले ते बरोबरच बोलले. कोण म्हणत आमचा पक्ष हा वाणी, ब्रह्मणांचा आहे. आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा आहे. आमचे 105 आमदार असतील, आमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येनं खासदार आहेत, एवढेच काय आमचे सर्व पदाधिकारी आणि मंत्री सुद्धा बहुजनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये कुठेही ब्राह्मण किवा वाणी समाजाची संख्या अधिक नाही.  मात्र खडसेंनी बोलताना हे लक्षात घ्यावे, की माणूस हा नुसता जातीने आणि समाजामुळे मोठा होत नाही, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

आत्मपरीक्षणाचा सल्ला

दरम्यान यावेळी बोलताना महाजन यांनी एकनाथ खडसेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. खडसेंनी एक लक्षात घ्यावं माणूस हा केवळ जाती, धर्मामुळे मोठा होत नाही तर तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि नेतृत्वक्षमतेमुळे मोठा होतो. कुणीही सांगेल, अवघा महाराष्ट्र सांगेल की देवेंद्र फडणवीस यांची क्षमता काय आहे ती?  खडसेंना खूप वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण जनतेला ते वाटायला हवंना. त्यामुळे खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावे असं महाजन यांनी म्हटलं आहे.

कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.