‘हिम्मत असेल तर गोव्याला एक मतदारसंघ लढवा, नुसती भाषणं कसली करता’, चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना थेट आव्हान

'हिम्मत असेल तर गोव्याला एक मतदारसंघ लढवा, नुसती भाषणं कसली करता', चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना थेट आव्हान
संजय राऊत, चंद्रकांत पाटील

संजय राऊत यांचं फारच चाललं आहे. सगळ्या जगातले विद्वान ते आहेत. कशाला त्यांनी पर्रिकरांच्या मुलाला द्या, अपक्ष लढू दे, तुमचं कोण ऐकायला बसलं आहे तिथे. हिम्मत असेल तर गोव्यातला एखादा मतदारसंघ लढवा तुम्ही. मोदीची गुजरातमधून उठतात आणि उत्तर प्रदेशात जाऊन लढतात, तुम्ही लढा. नुकती आपली भाषणं करता, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना फटकारलं आणि थेट आव्हानही दिलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 17, 2022 | 4:54 PM

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीवरुन (Goa Assembly Election) राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊतांना गोव्यातून लढण्याचं थेट आव्हानंच दिलं आहे.

संजय राऊत यांचं फारच चाललं आहे. सगळ्या जगातले विद्वान ते आहेत. कशाला त्यांनी पर्रिकरांच्या मुलाला द्या, अपक्ष लढू दे, तुमचं कोण ऐकायला बसलं आहे तिथे. हिम्मत असेल तर गोव्यातला एखादा मतदारसंघ लढवा तुम्ही. मोदीची गुजरातमधून उठतात आणि उत्तर प्रदेशात जाऊन लढतात, तुम्ही लढा. नुकती आपली भाषणं करता, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना फटकारलं आणि थेट आव्हानही दिलं आहे.

‘..तर शिवसेना आणि अन्य पक्ष बिनविरोध करणार का?’

त्याचबरोबर संजय राऊत गोवा विधानसभेच्या विषयावरून बरीच वक्तव्ये करतात. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरूनही ते टीका टिप्पणी करत आहेत. उत्पल पर्रिकर यांना भाजपाने उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध विजयी करण्याची हमी शिवसेना आणि इतर पक्ष देणार का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना केलाय.

संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

गोव्यातील भाजप नेते उत्पल पर्रिकर यांनी तिकीट वाटपावरून भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. गोव्यात खुनी, बलात्कारींना तिकीट मिळतं. मला का मिळत नाही? असा सवाल उत्पल पर्रिकर यांनी केला होता. याकडे संजय राऊत यांचं लक्ष वेधलं असता राऊत यांनी फडणवीसांवर खोचक टीका केली. उत्पल पर्रिकर यांच्या मताशी मी सहमत आहे. भाजपने नैतिकता, साधन शुचितेच्या गप्पा मारू नयेत. गोवा ही देवभूमी आहे. भाजपच्या तोंडी कायम नैतिकतेचं भजन असतं. भाजपच्या गोव्यातील नेत्यांवर गंभीर आरोप आहेत. ते लँड माफिया आहेत. काहींवर अफू चरस, गांज्याचे आरोप आहेत. त्यांना पक्षात घेतलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकरांचं योगदान काय? या पेक्षा राजकारणातील ग्रेट गॅम्बलर्स आणि ठकस् ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढू इच्छिता का? फडणवीसांचं गोव्यात येऊन अध:पतन झालं आहे त्याचं वाईट वाटतं. फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती. फडणवीस साहेबांकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने पाहतो. पण गोव्याची हवा त्यांना लागलेली दिसते, असा हल्लाबोल राऊत यांनी चढवला आहे.

इतर बातम्या :

Aurangabad: खासदारांनी स्वतःच्या निधीतूनच मराठी पाट्या लावाव्यात, शिवसेनेचा इम्तियाज जलील यांना टोला!

Goa Poll: राष्ट्रवादीची शिवसेनेशी आघाडी, उद्या पटेल, आव्हाड गोव्यात जाऊन चर्चा करणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें