Video: सरकार म्हणतं, ऑक्सिजननं एकही मृत्यू नाही मग बघा गडकरी काय म्हणतायत ‘त्या’ व्हीडीओत

अवघ्या आठ सेकंदाचा हा व्हीडीओ आहे पण केंद्र सरकार ऑक्सिजन मृत्यूच्या वादावर कसं ढळढळीत खोटं बोलतंय याचा पुरावा म्हणून हा व्हीडीओ दाखवला जातोय.

Video: सरकार म्हणतं, ऑक्सिजननं एकही मृत्यू नाही मग बघा गडकरी काय म्हणतायत 'त्या' व्हीडीओत
Gadkari's old video viral, expose govet


ऑक्सिजनच्या अभावी देशात कोरोना काळात एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारनं संसदेत सांगितलं
आणि त्यावरुन उठलेलं वादळ अजूनही शांत झालेलं नाही. शिवसेना खासदार संजय राऊत, आरजेडी खासदार
मनोज झा यांनी सरकारला याच मुद्यावरुन संसदेत धारेवर धरलं. सरकारनं कितीही हा मुद्दा खोडून काढायचा
प्रयत्न केले तरी ते तोकडे पडतायत. कारण पुरावे सरकारच्याविरोधात आहेत. त्यातच आता खुद्द नितीन गडकरींचा
एक व्हीडीओ समोर आलाय. ज्यात ते म्हणतात की, ऑक्सिजनच्या अभावी देशात अनेक मृत्यू झाले. गडकरींचा
हा व्हीडीओ सरकारच्याच डोळ्यात अंजन घालणारा आहे.

काय आहे गडकरींच्या व्हीडीओत?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हीडीओ सध्या व्हायरल झालाय. ह्या व्हीडीओत गडकरी म्हणतात-कोविडच्या
ह्या काळात आपल्या देशात अनेक जणांना ऑक्सिजनच्या अभावी जीव गमवावा लागला असं गडकरी म्हणतायत.
पत्रकार अभिनव पांडे यांनी हा व्हीडीओ ट्विट केला आहे. अवघ्या आठ सेकंदाचा हा व्हीडीओ आहे पण केंद्र
सरकार ऑक्सिजन मृत्यूच्या वादावर कसं ढळढळीत खोटं बोलतंय याचा पुरावा म्हणून हा व्हीडीओ दाखवला
जातोय.

काय म्हणाले खासदार मनोज झा?
याच मुद्यावर राज्यसभेत आरजेडी खासदार मनोज झा यांचं भाषण गाजतंय. झा म्हणाले, माझं भाषण असं काही नाही.
शोकात असलेल्या लोकशाही देशाच्या नागरिकाचं हवं तर हे बोलणं समजा. त्याच्यावतीने काही गोष्टी बोलल्या जातायत.
त्या लोकांना माझा आधी माफीनामा देतो ज्यांच्या मृत्यूलाही आम्ही मान्यता देत नाहीयोत. हा माफीनामा सर फक्त माझा
नाहीय. मे महिन्यात मी सहा आर्टीकल लिहिली. संसद चालू नव्हती. कुठे माझी तक्रार घेऊन जाऊ, कुणाला सांगू शकलो
असतो. मला माझ्या भाजपाच्या मित्रांनी, साथींनी कॉल केला. माझं अभिनंदन केलं. मी त्यांचेही आभार मानतो.
आणि सांगू इच्छितो की, एक सामुहिक माफीनामा ह्या सभागृहानं त्या जीवांना पाठवावा ज्यांची प्रेतं गंगेच्या पाण्यावर तरंगत होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI