उत्तम जानकरांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

जानकर (Uttam Jankar Malshiras) समर्थकांमधून जल्लोष साजरा केला जात आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे उत्तम जानकर यांना माळशिरसमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Uttam Jankar Malshiras, उत्तम जानकरांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

सोलापूर : प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हयातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार उत्तम जानकर (Uttam Jankar Malshiras) यांचा जातीचा दाखला न्यायालयाने वैध ठरवलाय. त्यामुळे जानकर (Uttam Jankar Malshiras) समर्थकांमधून जल्लोष साजरा केला जात आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे उत्तम जानकर यांना माळशिरसमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंब यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. 2009 ला उत्तम जानकर यांनी मोहिते पाटालांच्या गटाचे आमदार हणमंत डोळस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी जानकर केवळ साडेचार हजार मतांनी पराभूत झाले होते.

माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. जानकर यांच्याकडे हिंदू खटीक हा जातीचा दाखला आहे. याच दाखल्याच्या आधारावर जानकरांनी मागील निवडणूक लढवली होती. पण जात पडताळणी समितीने त्यांचा हिंदू खाटीक जातीचा दाखला रद्द केला होता.

उत्तम जानकरांना या निर्णायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जातीचा दाखला वैध ठरवल्याने विधानसभा लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण तरीही मोहिते पाटील गटाला हे मान्य होणार का हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील परस्परविरोधी असणारे मोहिते आणि जानकर दोन्ही गट आता भाजपावासी झाल्याने मोहिते पाटील जानकरांना उमेदवारी मिळाल्यास मदत करतील का? असा प्रश्न आहे. कदाचित मोहिते पाटील आमदार हणुमंत डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशिल आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव श्रीकांत भारती यांनी माळशिरसमधील शेतकरी कुटुंबातील राम सातपुते यांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, उत्तम जानकर यांचा जनमानसात चांगला प्रभाव असल्याने आणि धनगर समाजाचे नेते असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली तर त्याचा फायदा इतर ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने उत्तम जानकर यांचा माळशिरस मतदारसंघात भाजपा विचार करु शकते, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *