ठाकरे बंधूंचा सदावर्ते यांनी लावला निकाल, स्पष्टच म्हणाले की…
राज ठाकरे यांच्याकडे कोणताही मोठा नेता राहिलेला नाही. आहेत ती गल्लीतील पोरं आहेत अशीही टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना आणि शेकापच्या जयंत पाटील यांच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दोघा ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. एक एका विषयात नापास आणि दुसरा दुसऱ्या विषयात नापास यांचे एकत्र येऊन पास होतो का हे दोघेही बंधू नापास झाले आहेत.त्यांच्या राजकीय प्रगती पुस्तकावर लाल शेरा आहे अशीही जोरदार टीका सदावर्ते यांनी केली आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की दोन्ही ठाकरे बंधू राजकारणात फेल गेले आहेत. नापास झालेले आहेत. शेकापच्या जयंत भाईंनी त्यांच्या नादाला लागू नये. त्यांनी शेतकऱ्यांचे, शेतमजूरांचे प्रश्न लावून धरावेत. त्यांना वाटले असेल मुंबई, अलिबाग असा फायदा होईल परंतू आता दादर,परळ, लालबाग येथेही यांच्याकडे कोणीही राहिलेले नाही.राज ठाकरे यांच्याकडे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थात शून्य जनाधार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे तर सातत्याने गळती सुरुच आहे. त्यामुळे एक नापास अधिक दुसरा नापास म्हणून कोणी पास होत नाही असेही ठाकरे बंधूंवर टीका करताना सदावर्ते यांनी म्हटले आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या खातेपालट झाला याबाबत विचारता, सदावर्ते म्हणाले की त्यांना फारच हार्श शिक्षा झाली आहे असे वाटते. रम्मी खेळ आहे की जुगार हे आधी तपासायला हवे, तरीही त्यांचे ठिकाण मात्र चुकलेच. कोकाटे यांना क्रीडा खातं दिलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो, कॅबिनेटमध्ये राहून ते चांगल्याप्रकारे क्रीडा मंत्री होतील असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.अनिल परब यांना मला सांगायचं आहे की आपण परिवहन मंत्री होतात तेव्हा किती लोक मेली? 124 तेव्हा कोणता खेळ खेळलात असाही सवाल त्यांनी यावेळी केला.
ओवेसी याला का खाज सुटली ?
मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका झाली त्याबद्दल सदावर्ते म्हणाले की पुरोहित, पुजनीय साध्वी त्या दोघांना काँग्रेसी विचारांच्या लोकांनी त्रास दिला, तो काळ बोकळलेला होता.अडकवणाऱ्यांची काही ना काही चौकशी झाली पाहिजे. भारतीय संविधानाचा काल विजय झाला आहे. हिरवं फडके घेऊन हरामखोर अतिरेकी आतंक पसरवतात आणि सनातनी धर्माला दोष देतात. साध्वी यांनीही त्रास सहन केला.राजकारण करू नका. ओवेसी याला का खाज सुटली कालच्या न्यायालयच्या निकालानंतर असाही सवाल सदावर्ते यांनी केला आहे.
