
मुंबई : सिल्व्हर ओक (sliver oak) हल्ला प्रकरणी एक मोठा माहिती समोर आली आहे. अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर लोअर परळ येथील घराच्या गच्चीवर गेल्या सहा महिन्यांपासून बैठक सुरू असल्याच्या माहितीवरुन पोलीस (Police) अधिक तपास करीत आहेत. या बैठका कशासाठी घेतल्या जात होत्या. यामध्ये बैठकांना नियमित उपस्थिती राहणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. यामुळे सदावर्तेंच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला. यानंतर आता कोल्हापुरामध्ये कलम 153 अ नुसार गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बैठकीत येणाऱ्यांची सीसीटीव्हीच्या मदतीने माहिती घेतली जात आहे.
दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा आरोप केलाय. तसंच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचाी अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारं सदावर्तेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी दिलीप पाटील यांनी केली होती. दरम्यान, आता दिलीप पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत अखेर कोल्हापुरातही सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Skin Care : हळदीसोबत हे कॉम्बिनेशन करून फेसपॅक तयार करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
Zodiac | मधूर वाणी अगदी ‘साखरेसारखी’ अशीच या 4 राशींच्या लोकांची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?