AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : हळदीसोबत हे कॉम्बिनेशन करून फेसपॅक तयार करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

प्रत्येकाच्या त्वचेचा टोन (Skin tone) वेगवेगळा असतो, यामुळे त्वचेच्या समस्याही वेगळा असतात. कुणाची त्वचा कोरडी असते तर कुणाची त्वचा तेलकट असते. काही लोकांची त्वचा संवेदनशील (Sensitive skin) असते. तज्ञांच्या मते, व्यक्तीने त्याच्या त्वचेच्या प्रकारानुसार काळजी घेतली पाहिजे. असे केले नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊन आपली त्वचा अधिक खराब होऊ शकते.

Skin Care : हळदीसोबत हे कॉम्बिनेशन करून फेसपॅक तयार करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
त्वचेची काळजी घेण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 12:10 PM
Share

मुंबई : प्रत्येकाच्या त्वचेचा टोन (Skin tone) वेगवेगळा असतो, यामुळे त्वचेच्या समस्याही वेगळा असतात. कुणाची त्वचा कोरडी असते तर कुणाची त्वचा तेलकट असते. काही लोकांची त्वचा संवेदनशील (Sensitive skin) असते. तज्ञांच्या मते, व्यक्तीने त्याच्या त्वचेच्या प्रकारानुसार काळजी घेतली पाहिजे. असे केले नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊन आपली त्वचा अधिक खराब होऊ शकते. ज्या लोकांची त्वचा (Skin) तेलकट आणि कोरडी दोन्ही असते, यामध्ये नाकाचा काही भाग तेलकट असतो तर बाकीचा भाग कोरडा असतो. अशा लोकांना त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हळद अत्यंत फायदेशीर आहे.

हळद आणि मध

हे दोन्ही घटक त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. हळद त्वचेचा रंग सुधारते, मध त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करू शकते. हळदीतील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म देखील त्वचेवरील पिंपल्स दूर करू शकतात. ब्लॅक हेड्स काढण्यासाठी हळद आणि मध फायदेशीर ठरते.

हळद आणि लिंबू

एक वाटी घ्या आणि त्यात अर्धा लिंबाचा रस पिळून घ्या, आता त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि नंतर पेस्ट बनवा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. साधारण अर्ध्या तासानंतर हा फेसपॅक धुवा. लिंबामुळे आपल्या त्वचेवर चमक येण्यास मदत होते. मात्र, दरवेळी पेस्ट ही ताजीच असावी.

हळद आणि कडुलिंब

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्मांनी पूर्ण हा फेसपॅक आहे. पॅक बनवण्यासाठी तुम्हाला कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवावी लागेल. त्यात अर्धा चमचा हळद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊद्या. या पॅकमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.

आवळा आणि लिंबू

हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे आवळ्याचा रस, 2 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि त्यात आणखी 2 चमचे आवळा पावडर एकत्र करुन हा फेसपॅक चेह-यावर लावा. त्यानंतर 20 मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ जाण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण कधीही चेहऱ्याला लावू शकतो.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

तुम्हीही भेसळयुक्त चहापत्ती घेत नाहीयेत ना? भेसळयुक्त चहापत्ती ओळखण्यासाठी ही सोपी पध्दत जाणून घ्या!

अस्थमाचा त्रास होतोय…? मग आजच पुण्याच्या बीएसआयमध्ये जाऊन अस्थमावरील रामबाण औषध घ्या!

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार