Hasan Mushrif : हसन मुश्रीफ समर्थकांचा कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा, समरजितसिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मागच्या आठवड्यात समरजितसिंह घाटगे (Samarjeet Sinh Ghatge) यांच्या नेतृत्वाखाली भाजपे कागलमध्ये (Kagal) मोर्चा काढला होता. गोकुळ दूध संघामध्ये मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे चिरंजीव नवीद हे संचालक आहेत. वाढदिवसाच्या पुरवणीमध्ये गोकुळ दूध संघाने दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावात काही अक्षरांचा वापर करून 'राम' असा एकेरी उल्लेख केला होता.

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ समर्थकांचा कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा, समरजितसिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
समरजितसिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 12:11 PM

कोल्हापूर – मागच्या आठवड्यात समरजितसिंह घाटगे (Samarjeet Sinh Ghatge) यांच्या नेतृत्वाखाली भाजपे कागलमध्ये (Kagal) मोर्चा काढला होता. गोकुळ दूध संघामध्ये मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे चिरंजीव नवीद हे संचालक आहेत. वाढदिवसाच्या पुरवणीमध्ये गोकुळ दूध संघाने दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावात काही अक्षरांचा वापर करून ‘राम’ असा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे भाजपच्या समुदायाने कागलमध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेले होते. परंतु पोलिसांनी मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार द्यायला नकार दिल्याने पोलिस स्टेशन बाहेर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. आज हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी कागलमध्ये पोलिस स्टेशनवरती मोर्चा काढला आहे. तसेच समरजितसिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील मागणी करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

समरजीत घाटगे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप

आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समर्थक आज कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत. मुश्रीफ यांची बदनामी करणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच समरजीत घाटगे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. कागलमधील शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरातील निवडणुकीमुळे अनेकांचं लक्ष निवडणुकीकडे राहिलं होतं. त्याचवेळेस समरजितसिंह घाटगे यांनी मोर्चा काढल्याने ते अधिक चर्चेत आले होते.

मुश्रीफ म्हणतात मला बॅनरबाबत अजिबात माहिती नाही

कोल्हापूरमध्ये ज्यावेळी बॅनरचा वाद निर्माण झाला. त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी मला बॅनरबाबत काहीचं माहित नसल्याचे सांगितले आहे. तसेच तो बॅनर मी अद्याप पाहिलेला देखील नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते बॅनरच्या माध्यमातून मला शुभेच्छा देतात. त्यामुळे त्याबाबत अजूनही अनभिज्ञ आहे. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, मुश्रीफ यांनी आत्तापर्यंत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांचा वाढदिवस रामनवमीला नसतो. त्यांनी जनतेला मुर्ख बनवले आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी.

Vedaant Madhavan: आर. माधवनच्या मुलाने जिंकलं सुवर्णपदक; ‘डेन्मार्क ओपन’मध्ये अभूतपूर्व कामगिरी

Raj Thackeray Effect : राज ठाकरे इफेक्ट, नाशिकचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी, गृहमंत्र्यांची डीजींसोबत बैठक, एसपी, आयुक्तांना आदेश

Kishori Pednekar: राज ठाकरेंना एवढंच सांगेन, जागते रहो, नाही तर निवडणुका आल्यावर…; किशोरी पेडणेकरांचा टोला

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.