AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षवर्धन पाटलांच्या धरणं आंदोलनाला यश, ऊर्जा मंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आणि महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी रात्री आठ वाजता महावितरण कंपनीचे अधिकारी तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी आले. मात्र, तोडगा निघाला नाही व आम्ही फक्त निवेदन स्वीकारण्यासाठी आलो आहोत, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटील आक्रमक झाले आणि त्यांनी महावितरण कंपनीच्या दारासमोरच आंदोलन सुरू केले.

हर्षवर्धन पाटलांच्या धरणं आंदोलनाला यश, ऊर्जा मंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य
महावितरणच्या कारवाईविरोधात हर्षवर्धन पाटलांचं आंदोलन
| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 28, 2021 | 6:37 PM
Share

इंदापूर : तालुक्यात गेल्या 12 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचं काम सुरू होतं. थकीत वीज बिलापोटी ही कारवाई सुरू असल्याचं महावितरणकडून (MSEDCL) सांगण्यात येत होतं. मात्र या महावितरण कंपनीच्या निर्णयाच्या विरोधात इंदापूर तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने सुरू होती. विशेष बाब म्हणजे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या निवासस्थानासमोरही एक दिवस शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. शेतकऱ्यांची कोणत्याही मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) मैदानात उतरले. पाटील यांच्या उपस्थितीत 31 तास आंदोलन करण्यात आल्यानंतर अखेर राज्य सरकारकडून मागण्या मान्य करण्यात आल्या.

शनिवारी सकाळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आणि महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी रात्री आठ वाजता महावितरण कंपनीचे अधिकारी तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी आले. मात्र, तोडगा निघाला नाही व आम्ही फक्त निवेदन स्वीकारण्यासाठी आलो आहोत, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटील आक्रमक झाले आणि त्यांनी महावितरण कंपनीच्या दारासमोरच आंदोलन सुरू केले. चर्चा फिसकटली आणि आक्रमक झालेले शेतकरी व पाटील यांनी महावितरण कंपनीच्या दारासमोर आपले आंदोलन सुरू केले. याच वेळी हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या पिठलं भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर महावितरण कंपनीच्या दारासमोरच रात्रभर मुक्काम केला. अशा कडाक्‍याच्या थंडीतही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील महावितरण कंपनीच्या दारासमोर रात्रभर मुक्काम केला.

‘वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या अटीवर आंदोलन मागे’

आज सकाळी पुन्हा आंदोलन सुरू झाले महावितरण कंपनीचे अधिकारी आणि हर्षवर्धन पाटील यांच्या बैठका होत होत्या. मात्र, तोडगा निघत नव्हता अखेर 31 तासांच्या नंतर या आंदोलनाला यश आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला असल्याचे पाटील यांनी सांगितले. एक हाऊस पावरला पाचशे रुपये वीज भरणा करण्याच्या मागणीला करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले. तसंच तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या अटीवर हे आंदोलन संपवण्यात आले.

‘दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला’

दरम्यान, या आंदोलनावर भाष्य करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधत उपरोधात्मक टीका केली. भरणे म्हणाले भाऊ तुम्ही कारखान्याची बिल वेळवर दिली असती तर शेतकऱ्यांवर तशी वेळ आलीच नसती. भाऊ तुम्ही सहकाराचे तज्ञ आहात शेतकऱ्यांच्या या प्रश्नांबद्दल आपण लक्ष दिल्याने तुमचे मी अभिनंदनच करतो. खरंच शेतकरी मोठ्या संकटात आहे. तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल तर तुम्ही उसाचे बिल वेळेवर द्या, असे म्हणत राज्यमंत्री भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.

इतर बातम्या :

‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार नक्की येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार’, दरेकरांचा मोठा दावा

‘आम्ही पंतप्रधानांना वाकवलं, तु्म्हाला वाकवण्यासाठी किती वेळ लागणार’ एसटी संपावरुन आडम मास्तरांचा परबांना इशारा

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत