हरियाणात काँग्रेसच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली, भाजपला आत्मविश्वास नडला?

हरियाणात काँग्रेसच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली, भाजपला आत्मविश्वास नडला?

जननायक जनता पार्टी (जेजेपी) ने मुख्यमंत्रीपदाची अट ठेवत समर्थनाची (Haryana assembly election results) ऑफरही दिली. सोनिया गांधींनी काँग्रेसचे हरियाणातील प्रमुख नेते भूपिंदर सिंग हुडा यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

अनिश बेंद्रे

|

Oct 24, 2019 | 12:27 PM

Assembly Election Result 2019 : महाराष्ट्र विधानसभेत भाजपने सत्ता कायम राखली असली तरी हरियाणा गमावलं जाण्याची शक्यता आहे. हरियाणात काँग्रेसने मनोहरलाल खट्टर यांची चिंता वाढवली आहे. त्रिशंकू परिस्थिती झाल्यामुळे काँग्रेसने (Haryana assembly election results) सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे जननायक जनता पार्टी (जेजेपी) ने मुख्यमंत्रीपदाची अट ठेवत समर्थनाची (Haryana assembly election results) ऑफरही दिली. सोनिया गांधींनी काँग्रेसचे हरियाणातील प्रमुख नेते भूपिंदर सिंग हुडा यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

हरियाणा विधानसभेत एकूण 90 जागा आहेत, तर बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे. पण सुरुवातीच्या कलांनुसार भाजपला 41 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला 29 आणि जेजेपीला 10 जागा मिळत आहेत. जेजेपीने केवळ 11 जागांवरच मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली आहे. काँग्रेसकडे अपक्षांचा पाठिंबा घेण्याचाही मार्ग मोकळा आहे.

हरियाणातील परिस्थिती पाहता मनोहरलाल खट्टर यांना दिल्लीला बोलावण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करत हरियाणाकडे लक्ष दिलंय. एक्झिट पोलनुसार हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत दाखवण्यात आलं होतं. शिवाय प्रचारातही भाजपने विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला होता.

चौटाला परिवार पुन्हा एकत्र आल्यास भाजपचा मार्ग खडतर

हरियाणाच्या निवडणुकीत चौटाला परिवार किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांनी इंडियन नॅशनल लोकदलपासून फारकत घेत जेजेपीची स्थापना केली. जेजेपीला 10 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इंडियन नॅशनल लोकदलला पाच जागा मिळत आहेत. चौटाला कुटुंब एकत्र आल्यास काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्यापासून भाजपलाही रोखता येणार नाही.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें