खरंच असदुद्दीन ओवेसींनी बुद्धविहारात जाणे टाळले का?

  • Updated On - 4:01 pm, Fri, 5 July 19
खरंच असदुद्दीन ओवेसींनी बुद्धविहारात जाणे टाळले का?


औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी थेट रस्त्यावर उतरुन, औरंगाबादच्या गल्लीबोळात जाऊन प्रचार केला. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी औरंगाबादच्या गल्लीबोळात जाताना दिसले. ओवेसींनी हातात माईक घेऊन रस्त्यावर प्रचार सुरु केला. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे असंख्य तरुण या रॅलीत सहभागी झाले. मात्र या रॅलीत अनोखं चित्र पाहायला मिळालं.

ओवेसींची रॅली एका बुद्धविहाराजवळ आली. त्यावेळी काही कार्यकर्ते ओवेसींनी बुद्ध विहारात बोलावत होते. समोर कार्यकर्ते विहारात बोलावत असताना ओवेसी यांनी हाताने टाळाटाळ करत, त्यांनी सोबतच्या कार्यकर्त्यांना आत पाठवले. त्यावेळी ओवेसी तिथे थांबले असे वाटत असतानाच ते पुढे निघूनही गेले.

शेवटी बुद्ध विहारातले कार्यकर्तेही ओवेसींपाठोपाठ रॅलीत पुन्हा आले. याप्रकारामुळे ओवेसींनी बुद्धविहारात जाण्याचं टाळल्याची चर्चा उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात ऐकायला येत होती.

VIDEO –

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI