अशोक चव्हाण यांची संपत्ती किती?

नांदेड: नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्यात लढत होणार आहे. अशोक चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी त्यांची संपत्ती, दाखल गुन्हे यासह सर्व माहिती जाहीर केली. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. …

, अशोक चव्हाण यांची संपत्ती किती?

नांदेड: नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्यात लढत होणार आहे. अशोक चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी त्यांची संपत्ती, दाखल गुन्हे यासह सर्व माहिती जाहीर केली.

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाणही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांची संपत्ती किती याबाबत उत्सुकता आहे.

अशोक चव्हाण यांची संपत्ती

  • बँकेत रोख – 79 लाख 42 हजार 283 रुपये
  • बँकेत मुदत ठेव – 80 लाख 74 हजार 635
  • शेअर्स – 43 हजार 176
  • दाग-दागिने – 49 लाख 39 हजार 340
  • कृषिक/अकृषिक जमीन आजचे बाजार मूल्य – 20 कोटी 66 लाख 39 हजार 240
  • वाहने – महिंद्रा गुडस करिअर ( एकूण 4 गाड्या )

 

सौ अमिता चव्हाण संपत्ती

  • बँकेत रोख – 46 लाख 34 हजार 079
  • शेअर्स – 1 लाख 39 हजार 495 रुपये
  • दागिने- 1 कोटी 43 लाख 51 हजार 584
  • कृषिक/अकृषिक जमीन आजचे बाजार मूल्य – 11 कोटी 51 लाख 10 हजार 219

वाहने 

1) बजाज ट्रॅक्टर,

2) ट्रॅक्टरची ट्रॉली

3)फॉर्च्युनर कार

संबंधित बातम्या 

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?  

5 मिनिटांत फैसला! पंकजा मुंडे विरुद्ध अशोक चव्हाण   

पक्षात माझं कोणी ऐकत नाही, अशोक चव्हाण यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल   

काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *