अब्जाधीश…. छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?

अब्जाधीश.... छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?

सातारा : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. 23 एप्रिल रोजी म्हणजे तिसऱ्या टप्प्यात साताऱ्यात निवडणुका होणार आहेत. साताऱ्यातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले रिंगणात आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबाबत अनेकांना कुतूहल असतं. उदयनराजे भोसलेंनी काल अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून साताऱ्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्तीही समोर आली आहे.

उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न किती?

2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न निम्म्यानं घसरल्याचं चित्र आहे. 2014 साली 2 कोटी असलेले वार्षिक उत्पन्न 2018 अखेरीस एक कोटींपर्यंत आलं आहे. उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराज यांचे 2017-18 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न 8 लाख 71 हजार 774 रुपये आहे.

 • 2013-14 : 2 कोटी 3 लाख 51 हजार 479 रुपये
 • 2014-15 : 1 कोटी 54 लाख 89 हजार 756 रुपये
 • 2015-16 : 1 कोटी 17 लाख 77 हजार 47 रुपये
 • 2016-17 : 63 लाख 23 हजार 255 रुपये
 • 2017-18 : 1 कोटी 15 लाख 71 हजार 306 रुपये

उदयनराजे भोसले यांची जंगम मालमत्ता – 12 कोटी 31 लाख 84 हजार 348 रुपये

पत्नी दमयंतराजे यांची जंगम मालमत्ता – 81 लाख 39 हजार 254 रुपये

उदयनराजेंवर 1 कोटी 23 लाख 40 हजरा 338 रुपये बँकेचं कर्ज आहे.

उदयनराजे भोसले यांची स्थावर मालमत्ता :

 • स्वत: खरेदी केलेली मालमत्ता – 1 कोटी 13 लाख 9 हजार 275 रुपये
 • वारसाप्राप्त मालमत्ता – 1 अब्ज 34 कोटी 93 लाख 20 हजार 522 रुपये

दिवंगत प्रतापसिंह महाराज भोसले (उदयनराजेंचे वडील) यांच्या नावावर वारसाप्राप्त मालमत्ता 25 कोटी 26 लाख 67 हजार 68 रुपये आहे.

उदयनराजेंकडे कोणत्या गाड्या आहेत?

 • मारुती जिप्सी – 60 हजार रुपये
 • ऑडी – 15 लाख 60 हजार रुपये
 • मर्सिडिज बेन्झ – 48 लाख 165 रुपये
 • इन्डीवर – 27 लाख 59 हजार 885 रुपये

एकूण 91 लाख 70 हजार रुपयांच्या गाड्या उदयनराजे भोसले यांच्याकडे आहेत. तर त्यांची पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्याकडे व्हीडब्ल्यू पोलो ही 4 लाखांची गाडी आहे.

सोने, चांदी, दागिने किती आहेत?

 • उदयनराजेंकडे दागिने, सोने, चांदी – 37,917.72 ग्रॅम (किंमत – 1 कोटी 33 लाख 75 हजार 687 रुपये)
 • पत्नी दमयंतीराजेंकडे दागिने, सोने, चांदी – 4,750.33 ग्रॅम (किंमत – 32 लाख 98 हजार 256 रुपये)
 • कुटुंबाकडे दागिने, सोने, चांदी – 628.50 ग्रॅम (किंमत – 23 लाख 62 हजार 200 रुपये)

उदयनराजे साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले लढत आहेत. उदयनराजे हे साताऱ्यातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत. तरुणांचे गळ्यातील ताईत, सर्वसामान्यांमध्य मिसळणारे नेते म्हणून उदयनराजे यांची ओळख आहे. शिवाय, महाराष्ट्राचे आराध्य दैवात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने उदयनराजे यांच्याबद्दल साताऱ्यासह संपूर्ण देशात आकर्षण आणि कुतुहल आहे.

शिवसेनेकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे यांच्यासमोर लढणं हे नरेंद्र पाटील यांना मोठं आव्हान असेल. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, त्यात उदयनराजे यांच्यासारखा तगडा उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासमोर आहे.


Published On - 12:57 pm, Wed, 3 April 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI