मी काही मोठी नेता नाही, भाजपला मला संपवायचंय असं वाटत नाही: पंकजा मुंडे

मी काही मोठी नेता नाही, भाजपला मला संपवायचंय असं वाटत नाही: पंकजा मुंडे
pankaja munde

भाजप पंकजा मुंडे यांचं राजकारण संपुष्टात आणत आहे, या शिवसेनेच्या आरोपवर खुद्द भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. भाजपला मला संपवायचं असं मला वाटत नाही. (pankaja munde)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 09, 2021 | 2:44 PM

मुंबई: भाजप पंकजा मुंडे यांचं राजकारण संपुष्टात आणत आहे, या शिवसेनेच्या आरोपवर खुद्द भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. भाजपला मला संपवायचं असं मला वाटत नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. (i don’t think bjp vanish my political career, says pankaja munde)

पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुर्णविराम दिला. यावेळी त्यांचं सामनाच्या अग्रलेखाकडे लक्ष वेधलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की, मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील. मला वाटत नाही. मी अग्रलेख वाचला नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असं सांगतानाच राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून मी आले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

निर्णय न पटण्याचा प्रश्नच नाही

पक्षाचा निर्णय न पटण्याचा प्रश्नच नाही. पक्षाची एक पद्धत आहे. मला पक्षाचा फॉर्म भरायला लावला आहे. तेव्हा मी पात्र आहे का असं विचारलं होतं. त्यानंतर पक्षाने मला फॉर्म भरायला लावला. त्यानंतर त्यांनी रमेश आप्पा कराडांना पक्षाने फॉर्म भरायला लावला. आमच्या पक्षात पक्ष हा अंतिम असतो. त्यामुळे निर्णय पटणं न पटणं हा प्रश्नच नसतो, असं त्यांनी सांगितलं.

प्रीतम यांची चर्चा त्यांच्या वलयामुळे

प्रीतमताईंचं नाव होतं ते योग्य होतं. असं नाही की ते अयोग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही तर त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी पक्षाचं काम केलं आहे. त्यांनी कोणतीही बैठक बुडवली नाही. त्या नेहमी सक्रिय राहिल्या, त्या कष्टाळू आहेत. हुशार आहेत. महिला आहेत. तरुण आहेत. बहुजन चेहरा आहे. त्यामुळे त्यांचं नाव न येण्यासारखं त्यामध्ये काही नाही आहे. अनेक लोकांची नावं चर्चेत होती. त्यांची नावं आली नाही. पक्षाने एखादा निर्णय घेतला. चर्चा ही त्या नावाच्या वलयामुळे होत आहे. त्यामुळे त्याला विराम द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र माहीत नाही

मंत्रिमंडळ विस्तारात टीम देवेंद्रला स्थान देण्यात आलं आहे. त्यावर त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, टीम देवेंद्रमध्ये कोण आहे आणि टीम नरेंद्रमध्ये कोण आहे हे मला माहीत नाही. पक्षालाही अशा टीम मान्य नाहीत. आमच्याकडे राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि मी तृतीय असतो. आमच्याकडे मीपण मान्यच नाही. आमच्या संस्कृतीत ते बसत नाही. आमच्याकडे आपण आपण, आम्ही आम्ही चालतं. त्यामुळे पक्षात कोणती टीम आहे, असं वाटत नाही. (i don’t think bjp vanish my political career, says pankaja munde)

संबंधित बातम्या:

‘बाहेर’च्या नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे भाजपची मतं वाढण्याची शक्यता नाही?; पंकजा मुंडेंचं मिश्किल उत्तर

भागवत कराडांचा रात्री साडे बारा वाजता फोन आला होता, पंकजा मुंडेंनी नाराजी फेटाळली, आता म्हणाल्या सर्वांचं अभिनंदन

वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का, वाचा पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

(i don’t think bjp vanish my political career, says pankaja munde)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें