वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का, वाचा पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का, वाचा पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
pankaja munde

ह्या समाजाला एका ठिकाणी आणणं माझ्यासाठी चॅलेंज होतं. मुंडे साहेबांनी पन्नास चाळीस वर्ष एक ठिकाणी आणून ही घडी बसवली होती. त्या घडीला विस्कटू देऊ नये एवढी माझी साधी जबाबदारी. ती जबाबदारी पार पाडतेय'.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 09, 2021 | 2:05 PM

अखेर दोन दिवसानंतर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलंय. फक्त ट्विटरच नाही तर प्रत्यक्ष प्रेस
कॉन्फरन्स घेऊन पंकजा मुंडेंनी नाराजीच्या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिलं आहे. प्रीतम मुंडे
यांना मंत्रीपदाची संधी न देणं म्हणजे पंकजा मुंडेचा संपूर्ण खातमा करण्याचा प्रयत्न असल्याचही
सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. एवढच नाही तर भागवत कराडांना संधी देऊन वंजारी
समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असही सामनानं म्हटलं आहे. त्यावरही
पंकजा मुंडे यांनी सविस्तर विवेचन केलं.

काय म्हणाल्या नेमकं पंकजा मुंडे?
वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच
पंकजा मुंडे म्हणाल्या- ‘मी राजकारणात जी आले ते व्यवसाय म्हणून नाही आले. राजकारणाचं
व्रत घेऊन आले. माझ्या पित्याचा अचानक मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर बिथरलेला हा सगळा
समाज प्रचंड संतप्त होता, त्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर होतं. ह्या समाजाला एका ठिकाणी
आणणं माझ्यासाठी चॅलेंज होतं. मुंडे साहेबांनी पन्नास चाळीस वर्ष एक ठिकाणी आणून ही घडी
बसवली होती. त्या घडीला विस्कटू देऊ नये एवढी माझी साधी जबाबदारी. ती जबाबदारी पार पाडतेय’.

वंजारी म्हणून अभिमान पण महाराष्ट्राची नेता!
पंकजा मुंडे पुढं म्हणाल्या की, माझ्या समाजातील म्हणजे मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मला
मान्य नाही. वंजारी समाजात माझा जन्मय. वंजारी समाजाचा मी आयुष्यभर अभिमान बाळगणारी
व्यक्तीय. पण वंजारी समाजाबरोबरच मी राज्याची एक महिला नेता आहे. मला वाटतं की,
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सभा, सर्व समाजाच्या मी घेते.

पंकजा, प्रीतम म्हणजे वंजारी समाज नाही
भागवत कराड यांना मंत्री केलं गेलंय त्यावर पंकजा म्हणाल्या-
एक चांगली वक्ताय कारण मला एका समाजाचं म्हणून बघणं चुकीचं आहे. वंजारी समाजातला
एखादा व्यक्ती मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठिशी आहे आणि राहणार आहे.
फक्त मुंडे साहेबांनी ह्या गोष्टी हाताळल्या, त्याच पद्धतीनं हाताळावं, कुणा गरीबाला वाटू नये.
पक्षानं आता त्यांच्यावर विश्वास टाकलाय, बघू आता त्यात आणखी किती ताकद वाढ होते.
माझी अशी अपेक्षाय की, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे म्हणजेच काही वंजारी समाज नाहीय.
इतर लोक म्हणजेही वंजारी समाज आहे. त्यामुळे आणखी ताकद वाढण्याचं चित्रं दिसलं पाहिजे.
आपण बघू भविष्यात काय होईल ते आणि ताकद वाढेल अशी शुभेच्छा देते मी.

सामनाच्या अग्रलेखात काय लिहिलं गेलंय?
सामनाचा आजचा अग्रलेख हा मोदी मंत्रिमंडळ विस्तारावर आहे. त्याच लेखात राज्यमंत्री झालेले भागवत
कराड आणि पंकजा मुंडेंबद्दल लिहिलं गेलंय. अग्रलेख म्हणतो- श्री भागवत कराड हे राज्यमंत्री झाले.
पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराडे हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले,
पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी
व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें