घरात बसू, पण शिवसेनेशी गद्दारी आमच्या स्वप्नातही येणार नाही : सुनील शिंदे

या सर्वांवर स्पष्टीकरण देत सुनील शिंदे यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेशी गद्दारी करणं आमच्या स्वप्नातही येणार नाही, असं त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

घरात बसू, पण शिवसेनेशी गद्दारी आमच्या स्वप्नातही येणार नाही : सुनील शिंदे
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 10:23 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण सचिन अहिर यापूर्वी ज्या मतदारसंघाचे आमदार होते, त्या मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. या सर्वांवर स्पष्टीकरण देत सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेशी गद्दारी करणं आमच्या स्वप्नातही येणार नाही, असं त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

सचिन अहिर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला, वरळीचे स्थानिक आमदार म्हणून मी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. तिथे उमेदवारी कुणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी आमच्या पक्ष नेतृत्वाचा निर्णय असेल, असं सुनील शिंदे म्हणाले.

मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. माझं कुटुंब आणि मी शिवसैनिक आहोत. शिवसेना आम्ही फायद्या किंवा तोट्यासाठी कधीच मानली नाही. शिवसेना आमचा जीव आहे. शिवसेनाप्रमुखांवर निष्ठा आहे. पदांवर राहून कामे केली, त्याची पोचपावती मिळाली. आमदारकी मिळाली. राजकारण, आमदारकी हे काही आमचं सर्वस्व नाही. भविष्यात आमच्यासाठी संघटना काही निर्णय घेईल याची मला खात्री आहे. शिवसेनेशी गद्दारी आमच्या स्वप्नात येणार नाही. एकवेळ घरात बसू, असं म्हणत त्यांनी वृत्त खोडून काढलं.

अन्य कुठल्या पक्षात जाण्याची कल्पना मी स्वप्नात देखील करू शकणार नाही. आम्हाला पद मिळालं नाही तर चालेल, पण संघटनेशी बेईमानी मनातही येणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

कोण आहेत सुनील शिंदे?

  • 2007 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं
  • 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार
  • 2014 च्या निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळवली, सचिन अहिर यांना 37613 मतं मिळाली
  • 2015 ला उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी

संबंधित बातम्या 

आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?   

राष्ट्रवादी फोडणार नाही, शिवसेना वाढवणार : सचिन अहिर  

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.