आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल : शरद पवार

जर आव्हान म्हणून हे काम स्वीकारलं तर पुढील दोन वर्षात काम होणं अशक्य नाही. हे स्मारक जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरले," असे शरद पवार (sharad pawar visit indu mill) महणाले.

आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल : शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 5:57 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (21 जानेवारी) इंदूमिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी (sharad pawar visit indu mill) केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. “आंबेडकरांच्या स्मारकाचं केवळं 25 टक्के काम झालं आहे. अजून 75 टक्के काम बाकी आहे. त्यामुळे जर आव्हान म्हणून हे काम स्वीकारलं तर पुढील दोन वर्षात काम होणं अशक्य नाही. हे स्मारक जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरले,” असे शरद पवार (sharad pawar visit indu mill) महणाले.

“या स्मारकाचे काम करणारी संस्था आंतरराष्ट्रीय आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर हे स्मारक अत्यंत आकर्षक राहणार आहे. जगात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे. अगदी चीनपर्यंत त्यामुळे या स्मारकाचे आकर्षण राहणार आहे. बौद्ध विचारांची आस्था असणार्‍यांना हे स्मारक महत्वाचे असणार आहे.त्यामुळे ज्यांनी घटना दिली त्या महामानवाच्या दर्शनाला जगातील लोक आल्याशिवाय राहणार नाही,” असेही शरद पवार म्हणाले.

“मी काही सूचना केल्या नाहीत. पण मला 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल या दोन तारखा समोर दिसतात. लाखो लोक इथे येतात. सगळा घटक बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भारावून जाईल,” असेही शरद पवार यांनी सांगितले.

“आंबेडकरांचे हे स्मारक महाराष्ट्राचे मुंबईचे आकर्षण झाल्याशिवाय राहणार नाही. जगभरातील सर्व बौद्ध लोकांचे हे या ठिकाणी येतील. शिवाजी पार्कमध्ये चैत्यभूमी आणि बाजूला आंबेडकरांचे स्मारक हा दुहेरी संगम आहे. या देशातील प्रत्येक नागरिक महामानवाच्या दर्शनासाठी येईल,” असेही शरद पवार (sharad pawar visit indu mill) म्हणाले.

“मी फक्त या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो होतो. त्यांना काहीही सूचना केलेल्या नाहीत. या स्मारकाला ज्याचा ज्याचा हातभार लागला असेल त्याचेही अभिनंदन,” असेही पवार म्हणाले.

“आपल्या देशात स्वातंत्र्य आहे. कोणालाही बोलण्याचे अधिकार आहेत. बोलण्यावर मर्यादा नाहीत. त्यामुळे जे योग्य असेल ते घ्यायचं आणि नसेल ते सोडून काम करायचं,” असेही शरद पवार म्हणाले.

“आंबेडकर स्मारकाचा निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यावरही वाडिया रुग्णालयाला काय निधी द्यायचा त्याबाबत मुख्यमंत्री बैठक घेतील. काही ना काही कमतरता असते. कमतरता घालवण्याची जबाबदारी सरकारची असते. अमेरिकेत गेल्यावर आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहतो. त्यामुळे शिवस्मारक, आंबेडकर स्मारक हे सर्व झालं पाहिजे. जर लोकांची इच्छा असेल तर काटकसर करण्याची गरज नाही. हे स्मारक उभारून दुसरं विद्यापीठही उभं राहू शकतं. एवढी राज्याची ताकद आहे,” असे प्रत्युत्तरही पवारांनी आंबेडकरांच्या टीकेला (sharad pawar visit indu mill) दिलं.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.