‘राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना डोक्यावर चढवलेय, पवारांच्या दौऱ्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला फरक पडणार नाही’

उत्तर महाराष्ट्रात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. त्याठिकाणी गिरीश महाजनही आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याने फरक पडणार नाही. | Prasad Lad

'राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना डोक्यावर चढवलेय, पवारांच्या दौऱ्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला फरक पडणार नाही'
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 3:51 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डोक्यावर चढवले आहे. एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत, असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. भाजप सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरु झालाय. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरु आहे. त्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरु ठेवू, असे प्रसाद लाड यांनी सांगितले. (NCP and Shard Pawar hype Eknath Khadse’s image)

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. माननीय शरद पवार हे गेल्या 40 वर्षांपासून राजकीय दौरे करत आहेत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. शरद पवारांनी एकनाथ खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रात दौरा केला तरी भाजपला काही फरक पडणार नाही, असा दावा प्रसाद लाड यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवत आहे. मुळात एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती तर ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.

त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात कोणी किती दौरे केले तरी भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. त्याठिकाणी गिरीश महाजनही आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याने फरक पडणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.

खडसेंच्या प्रवेशानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्रात, तारीख आणि स्थळ ठरलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या:

भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे ‘अ‌ॅक्शन मोड’मध्ये, नेते-कार्यकर्त्यांसोबत खडसेंच्या बैठका सुरु

भाजपमध्ये असतो तर वाजपेयी-अडवाणींसारखी माझी अवस्था झाली असती : एकनाथ खडसे

ऑपरेशन कमळबाबत इतक्यात सांगता येणार नाही, पण पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु : प्रसाद लाड

(NCP and Shard Pawar hype Eknath Khadse’s image)

Non Stop LIVE Update
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.