AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुध भेसळ केली तर… मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला मोठा टोकाचा निर्णय

अन्न पदार्थातील भेसळ ही गंभीर बाब आहे. यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यवर गंभीर दुष्परिणाम होतो. कर्करोगासारखा दुर्धर आजार अनेकांना होतो. त्यामुळे भेसळखोरांवर एमपीडीएपेक्षांही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

दुध भेसळ केली तर... मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला मोठा टोकाचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 25, 2024 | 10:36 PM
Share

राज्यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ करणाऱ्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवावी. अशी भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अन्न पदार्थातील भेसळ ही गंभीर बाब आहे. यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यवर गंभीर दुष्परिणाम होतो. कर्करोगासारखा दुर्धर आजार अनेकांना होतो. त्यामुळे भेसळखोरांवर एमपीडीएपेक्षांही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. अन्न पदार्थातील भेसळ व दुध तसेच दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी प्रभावीपणे कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी दोन्ही विभागांना सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.

दुधातील भेसळीचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. हे चिंताजनक आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठीच अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी गृह विभागाचे सहकार्य घ्यावे. भेसळीविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाने कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले.

शालेय शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग एआयच्या वापरांसह विविधस्तरीय उपाययोजना करत आहे. त्यांच्याशी छत्रपती संभाजीनगरचे तत्कालिन आयुक्त व्ही. रमणी यांनी राबविलेल्या पॅटर्नची सांगड घालण्यात यावी. हा पॅटर्न जिल्हा परिषदांबरोबरच राज्यातील महानगरपालिकांच्या शाळांत राबवण्यात येईल, यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.