AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती’ फाईल आधी गाडीत ठेवा, राज्यपालांच्या भेटीदरम्यान राऊतांच्या हाती महत्त्वाची फाईल

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut meet Governor Bhagat Singh Koshyari)  आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

'ती' फाईल आधी गाडीत ठेवा, राज्यपालांच्या भेटीदरम्यान राऊतांच्या हाती महत्त्वाची फाईल
| Updated on: Nov 04, 2019 | 7:19 PM
Share

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut meet Governor Bhagat Singh Koshyari)  आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यपालांच्या भेटीदरम्यान राऊत आणि कदम यांच्यासोबत एक फाईल (Important File with Sanjay Raut) देखील होती. पत्रकार परिषदेत त्या फाईलविषयी विचारल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ सुरक्षारक्षकांना ती फाईल गाडीत ठेवायला लावली. त्यामुळे या फाईलची चांगलीच चर्चा होत आहे.

संजय राऊत म्हणाले, दुर्दैवाने ती फाईल समोर आली आहे. फाईलमध्ये काय आहे याचा लवकरच खुलासा करु.” संजय राऊत यांनी या भेटीत राज्यपालांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ‘फटकारे’ आणि उद्धव ठाकरे यांची 2 पुस्तकं भेट दिली. या भेटीत (Sanjay Raut meet Governor Bhagat Singh Koshyari) सध्याच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, “आम्ही राज्यपालांशी प्रदिर्घ चर्चा केली. यात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाली. मात्र, आमच्या दृष्टीने ही सदिच्छा भेट होती. उद्धव ठाकरेकडून आम्ही त्यांना भेटलो. राज्यपालांना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंचं “फटकारे” आणि उद्धव ठाकरे यांचं पाहावा विठ्ठल आणि महाराष्ट्र माझा हे गडकिल्ल्यांबाबतचं पुस्तकं भेट दिलं. राज्यपालांनी ही पुस्तकं चाळली. त्यांनी ही पुस्तकं खूप आवडली.”

लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं आणि त्यासाठी शिवसेना हा कुठेही अडथळा ठरत नाही. ही परिस्थिती आम्ही राज्यपालांपुढे मांडली आहे, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. सरकार स्थापन करण्यासाठी उशिर का होतो याविषयी आमच्याकडे माहिती नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

“खूप दिवसांनी महाराष्ट्राला अनुभवी आणि तटस्थ राज्यपाल मिळाले”

राज्यपालांनी आमचं म्हणणं तटस्थपणे ऐकलं असंही राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, “खूप दिवसांनी महाराष्ट्राला अनुभवी आणि तटस्थ राज्यपाल मिळाले.” राज्यपालांना भेटल्यानंतर राऊत ‘मातोश्री’वर गेले. त्यांनी राज्यपालांसोबतच्या भेटीची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली.

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....