मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत नियम पाळू शकतात, तर मग आम्ही नियम पाळून सण साजरे करु शकत नाही का? : इम्तियाज जलील

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी बकरी ईदनिमित्ताने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, या मार्गदर्शक सूचनांवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे (Imtiaz jaleel ask question on bakri eid festival guideline).

मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत नियम पाळू शकतात, तर मग आम्ही नियम पाळून सण साजरे करु शकत नाही का? : इम्तियाज जलील
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 3:35 PM

मुंबई : “कोरोनाचे नियम फक्त आम्हालाच आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येला जाणार आहेत, मग ते चालतं का? ते नियम पाळू शकतात, तर आम्ही नियम पाळून सण साजरे करु शकत नाही का?”, असे प्रश्न एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले आहेत (Imtiaz jaleel ask question on bakri eid festival guideline). इम्तियाज जलील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नियम आणि अटी ठेवून सरकारने देशातील सर्व धार्मिक स्थळे उघडावी, असं मत व्यक्त केलं.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी बकरी ईदनिमित्ताने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, या मार्गदर्शक सूचनांवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. “सरकारने प्रतिकात्मक बकरी ईद कशी साजरी करायची हे जरा समजावून सांगावं. तुम्ही हुकूमशाहासारखे आदेश काढायचे आणि लागू करायचे. तुम्ही नियम अटी घालून मंदिर-मशीद उघडा”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मी फक्त ईदबाबत बोलतोय असं नाही. अन्य सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. तर मंदिर-मशीद सुरु करण्यात काही हरकत नसावी. ऑगस्टमध्ये सणवार जास्त आहेत, गणेशोत्सव येतोय, बकरी ईद आहे, सर्व धार्मिक स्थळं उघडा”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

“चार महिने झाले मंदिर-मशिदी धार्मिक स्थळं बंद आहेत, पण लोकांची ही श्रद्धास्थानं आहेत, वयस्करांसाठी तर हे आवश्यक आहे, नियम अटी ठेवल्या तर सर्व सुरळीत होऊ शकतं”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

“प्रतिकात्मक बकरी ईद कशी साजरी करणार? मंदिरामध्ये कोणीही 3 मिनिटांपेक्षा जास्त थांबत नाहीत. तुम्ही नियम अटी टाकून हे सुरु करु शकता. तुम्ही संविधानाविरोधात नियम का लागू करताय? तुमची हुकूमशाही का?”, असे सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले (Imtiaz jaleel ask question on bakri eid festival guideline).

दरम्यान, “अयोध्येच्या राम मंदिराला आमचा विरोध नाही. सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. पण पंतप्रधानांना प्राथमिकता कळायला हवी. सध्या कोरोना आहे. मंदिर तीन महिने उशिरा बांधलं तर चालणार नाही का?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

संबंधित बातम्या :

Bakra Eid | नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, बकरी ईदच्या नियमावलीवर इम्तियाज जलील आक्रमक

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही, कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची बकरी ईदच्या नियमावलीवर नाराजी

प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.