पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी झाले ‘शवामी गंगे’, काँग्रेस खासदाराचा हल्लाबोल

खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 'नमामि गंगे' ऐवजी 'शवामी गंगे' झाल्याची टीका केलीय.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 'नमामि गंगे' ऐवजी झाले 'शवामी गंगे', काँग्रेस खासदाराचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गंगा नदी, खासदार बाळू धानोरकर
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 3:11 PM

चंद्रपूर : उत्तर प्रदेश आणि बिहारमधून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीत सध्या मृतदेहांचा खच पाहायला मिळतोय. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती गंगा नदीत टाकले गेल्याचं पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात तर बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीत हे मृतदेह तरंगताना पाहायला मिळाले. या घटनेनंतर दोन्ही राज्यातील सरकार खडबडून जागं झालंय. या प्रकारावर महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ झाल्याची टीका केलीय. (Hundreds of bodies were found floating in the Ganga river)

गंगा नदीत आतापर्यंत शेकडो मृतदेह प्रवाहात वाहून आल्याचं गाझीपूर आणि बक्सरमध्ये दिसून आलं. त्यातील काही मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. त्यावरुन बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत भारताची मान शरमेनं खाली गेल्याचं म्हटलंय. हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेण्याचं आवाहनही धानोरकर यांनी केलंय.

प्रियंका गांधींचंही मोदींवर टीकास्त्र

गंगा नदीत आढळून आलेल्या मृतदेहांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. “मिळालेल्या माहितीनुसार बलिया, गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झांरी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जातोय. उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य बनत चाललं आहे. या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली न्यायिक तपास झाला पाहीजे, अशी मागणी प्रियंका यांनी ट्विटरद्वारे केलीय.

लाकडाची व्यवस्था नसल्यामुळे मृतदेह गंगेमध्ये फेकले जातात

पावनी येथे राहणारे नरेंद्र कुमार मौर्य म्हणतात की, चौसा घाटाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कोरोना संसर्गामुळे येथे दररोज 100 ते 200 मृतदेह येतात आणि लाकडाची व्यवस्था नसल्यामुळे मृतदेह गंगेमध्ये फेकले जातात, यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातंय. एसडीएम सदर के. के. उपाध्याय असेही म्हणाले की, “हे मृतदेह जाळण्याची परंपरा असल्याने हे बिहारचे नव्हे तर उत्तर प्रदेशचे मृतदेह असू शकतात.” लोकांनी थेट प्रभारी प्रशासकीय अपयशाकडे बोट ठेवलेय.

संबंधित बातम्या : 

Maharashtra lockdown Extended | राज्यात कोरोनाचा विळखा, कडक निर्बंध 1 जूनपर्यंत लागू राहणार

Coronavirus: ‘मांसाहारामुळे कोरोना होत नाही; फक्त अन्नपदार्थ व्यवस्थित शिजवून खा’

Hundreds of bodies were found floating in the Ganga river

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.