Coronavirus: ‘मांसाहारामुळे कोरोना होत नाही; फक्त अन्नपदार्थ व्यवस्थित शिजवून खा’

ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी | Non veg food coronavirus

Coronavirus: 'मांसाहारामुळे कोरोना होत नाही; फक्त अन्नपदार्थ व्यवस्थित शिजवून खा'
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 12:16 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मांसाहारी पदार्थांच्या सेवनामुळे कोरोना होण्याचा जास्त धोका आहे, अशी एक चर्चा सुरु आहे. मात्र, झेन रुग्णालयाचे संचालक रॉय पाटणकर यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मांसाहाराचे सेवन केल्याने कोरोना (Coronavrius) होतो हा निव्वळ भ्रम आहे. या गोष्टीचा कोरोनाशी कोणताही संबंध नाही. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने ही गोष्ट स्पष्ट केली आहे, असे रॉय पाटणकर यांनी सांगितले. (There is no farm in eating nonveg food in coronavirus pandamic)

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी केवळ अन्न व्यवस्थित शिजवून खाल्ले पाहिजे. मग अंडी किंवा कोणतेही मांसाहारी पदार्थ खा. शाकाहारी आणि मांसाहारी लोकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सारखेच आहे. त्यामुळे मांसाहाराच्या सेवनामुळे कोरोना होतो, या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांची प्रतिकारक्षमता जास्त

ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी असल्याचे दिसून आले आहे. या लोकांच्या शरीरातील वेगळ्या अँटीबॉडीज आहेत का, यावर संशोधन सुरु आहे. लोकांनी ऐकीव माहितीकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला डॉ. रॉय पाटणकर यांनी दिला.

कोरोना इतक्यात जाणार नाही

कोरोना हा आता पुढील काही काळ आपल्या आयुष्याचा भाग राहणार आहे. तो इतक्यात जाणार नाही. सध्या पँडेमिक आहे, मग एपिडेमिक आणि नंतर एंडेमिक येईल. या तिन्ही टप्प्यांमध्ये लोकांनी मास्क घालणे गरजेचे आहे. तसेच कोविडच्या नियमांचे पालन केले पाहिजे. लोकांनी या सवयी अंगवळणी पाडून घेतल्या पाहिजेत, असे डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 62 हजार 727 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 120 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 62 हजार 727 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 120 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 52 हजार 181 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित बातम्या :

Wardha Lockdown | वर्ध्यात खबरदारी म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ, आणखी 5 दिवस निर्बंध कायम

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यावर एकमत, 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपे

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

(There is no farm in eating nonveg food in coronavirus pandamic)

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.