लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत 7 पैकी 6 भाजपेतर, विजय रुपाणी तळाला, ठाकरेंचा कितवा नंबर?

देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न इंडिया टुडेने केला. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती मिळाली.(India Today best CM survey) 

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत 7 पैकी 6 भाजपेतर, विजय रुपाणी तळाला, ठाकरेंचा कितवा नंबर?
Follow us
| Updated on: Aug 08, 2020 | 1:54 PM

नवी दिल्ली : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अव्वल स्थान कायम राखलं आहे. इंडिया टुडे ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या सातपैकी योगी आदित्यनाथ सोडले तर सहा मुख्यमंत्री हे भाजपेत्तर आहेत. (India Today best CM survey)

देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न इंडिया टुडेने सर्व्हेच्या माध्यमातून केला. यामध्ये 24 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली.  (India Today best CM survey)

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप 5 मध्ये आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयुक्तरित्या पाचव्या स्थानी आहेत. महत्त्वाचं म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे लोकप्रिया मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात तळाला आहेत. (best chief minister in India)

या यादीत योगींनंतर दुसऱ्या स्थानी 15 टक्के पसंतीसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. तर 11 टक्के पसंतीसह तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी आहेत. चौथ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (9 टक्के) आहेत. तर उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार हे 7 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकवर आहेत.

या यादीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी या सर्वांना केवळ 2 टक्के पसंती मिळाली.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ – 24 टक्के
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल – 15 टक्के
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी – 11 टक्के
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी – 9 टक्के
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – 7 टक्के

(India Today best CM survey)

संबंधित बातम्या 

Special Report | कोरोनाचं संकट गंभीर, ठाकरे मात्र खंबीर! उद्धव ठाकरे ठरतायत लोकप्रिय मुख्यमंत्री   

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया 

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.