AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

तमाम शिवसैनिकांचे प्रेम आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही" अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. (Uddhav Thackeray Popular Chief Ministers)

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jun 04, 2020 | 5:19 PM
Share

मुंबई : “लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय आहे” असं म्हणत लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. एका खासगी सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचा समावेश सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत करण्यात आला आहे. (Uddhav Thackeray First Reaction on Popular Chief Ministers Survey)

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रिपद हे निमित्त आहे, महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय आहे” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : राष्ट्रपती राजवट लावा म्हणणारे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ‘आपल्या’ माणसांनी आकडे पाहावे : मुख्यमंत्री

“महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकाऱ्यांचे आभार या सर्वांचे आभार. अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही” अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

(Uddhav Thackeray Popular Chief Ministers)

‘आयएएनएस’ आणि ‘सीव्होटर्स’ संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के इतकी असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तर गेली सलग वीस वर्षे ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

आयएएनएस आणि सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातील टॉप 5 मुख्यमंत्री

1. नवीन पटनायक (ओदिशा) – 82.96 टक्के 2. भूपेश बघेल (छत्तीसगड) – 81.06 टक्के 3. पिनराई विजयन (केरळ) – 80.28 टक्के 4. जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) – 78.52 टक्के 5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) – 76.52 टक्के

(Uddhav Thackeray First Reaction on Popular Chief Ministers Survey)

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.