Ravikant Tupkar : आताच हस्तक्षेप करा, नाहीतर राज्यात कायदा नि सुरक्षेचा प्रश्न गंभीर..रविकांत तुपकर यांनी का दिला राज्य सरकारला इशारा..

गणेश सोळंकी

गणेश सोळंकी | Edited By: कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 9:27 PM

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काय दिला इशारा..

Ravikant Tupkar : आताच हस्तक्षेप करा, नाहीतर राज्यात कायदा नि सुरक्षेचा प्रश्न गंभीर..रविकांत तुपकर यांनी का दिला राज्य सरकारला इशारा..
राज्य सरकारला इशारा
Image Credit source: सोशल मीडिया

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. विमा कंपनीच्या (Insurance Company) मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांच्या (Farmer) संतापाचा कडेलोट होण्याअगोदर राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law And Order) प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. विमा कंपनीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने दबाव न टाकल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

AIC विमा कंपनीवर शेतकरी प्रचंड नाराज आहेत. या कंपनीने प्रिमियमपेक्षा ही कमी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली आहे. या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानी पुसल्या गेली आहेत. अनेक शेतकरी विम्यापासून वंचित असल्याचा दावा त्यांनी केला.

या कंपनीच्या कारभाराच्या पद्धतीवरही शेतकरी नाराज असल्याचे तुपकर म्हणाले. या कंपनीने परस्पर पंचनामे केल्याचा आरोप करण्यात आला. विमा कंपनीने कृषी विभागाने केलेले पंचनामे गृहीत धरले नाहीत. परस्पर विमा दावा अर्ज भरल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे.

विमा कंपनीच्या या मनमानी काराभाराविरोधात कृषी विभागानेही कडक पाऊल उचलले आहे. ही कंपनी कृषी विभागालाही जुमानत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कंपनीविरोधात कृषी अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे तुपकर यांनी सांगितले.

या कंपनीने राज्यातील शेतकऱ्यांकडून विम्याच्या प्रिमियम पोटी मोठी रक्कम जमा केली. राज्य शासनाकडूनही कंपनीला मदत मिळाली. आता या कंपनीने संपूर्ण असहकार्याचे धोरण स्वीकारले आहे. कंपनीचे कार्यालय बंद राहणार असून प्रतिनिधींचे मोबाईलही बंद ठेवण्यात येणार असल्याचा दावा तुपकर यांनी केला.

हे सुद्धा वाचा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी या विमा कंपनीवर दबाव टाकावा. शेतकऱ्यांना पीक विम्याची संपूर्ण रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होईल, असा इशारा तुपकर यांनी दिला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI