AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदांता गेला हे दुर्देवी, पण आगामी उद्योगांचं काय ? शिंदे सरकारमधील मंत्र्याचं उत्तर अन् विरोधकांना सल्लाही..!

वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, सध्याचे राज्य सरकार हे गतिमान असल्याचे म्हणत त्यांनी टोलाही लगावला. पण शरद पवार यांनीच दोन मुख्यमंत्र्यांमधला फरक सांगितला हे एक बरे झाले, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

वेदांता गेला हे दुर्देवी, पण आगामी उद्योगांचं काय ? शिंदे सरकारमधील मंत्र्याचं उत्तर अन् विरोधकांना सल्लाही..!
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 15, 2022 | 4:48 PM
Share

पुणे :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्प हा काही दोन महिन्यांमध्येच माघारी गेला असे नाही, तर (MVA) महाविकास आघाडी सरकारनेही सोई-सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. महाविकास आघाडी हे पाप आता राज्य सरकारच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वकाही दोन महिन्यातच झाले असे नाही, यासाठी मोठी पार्श्वभूमी आहे असा दावा (Abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. असे असतानाही वेदांता प्रकल्प हा परराज्यात जाणे हे दुर्देवी आहे. यामुळे राज्यावर काही थेट परिणाम होणार नाही तर आगामी 6 महिन्यात वेगवेगळे प्रकल्प राज्यात नव्याने येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. राज्यात आणि केंद्रातही सत्ता असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत हे वेगवेगळे प्रोजेक्ट राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ते एक बरं झालं..!

वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, सध्याचे राज्य सरकार हे गतिमान असल्याचे म्हणत त्यांनी टोलाही लगावला. पण शरद पवार यांनीच दोन मुख्यमंत्र्यांमधला फरक सांगितला हे एक बरे झाले, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. शिवाय वेदांता प्रकल्प हा गुजरातला यामध्ये राज्य सरकारच दोषी असे नाही तर सुरवातीपासून नेमके काय झाले होते हे देखील पाहणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

भविष्यात उद्योग येतील पण आताचे काय..?

वेदांता प्रकल्प गेला तरी आगामी काळात अनेक उद्योग राज्यात आणू असे आश्वासन दिले जात आहे. पण हे केवळ एक गाजर असून हा प्रकल्प गेलाच कसा आणि तो परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवाय याबाबत योग्य पाऊल उचलले गेले नाहीतर राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार