AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही, वृत्त निराधार: शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याचं वृत्त होतं. स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. (sharad pawar)

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही, वृत्त निराधार: शरद पवार
sharad pawar
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 6:35 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याचं वृत्त होतं. स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. (its baseless that i talked with prashant kishore about contesting president election, says sharad pawar)

शरद पवार यांच्या हवाल्याने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे. प्रशांत किशोर यांनी माझ्याशी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडलंय हे मला माहीत नाही. प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नव्हती. 2024च्या निवडणुकीवर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

राहुल यांच्या भेटीनंतर तर्कवितर्क

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जात होतं. 2022मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे यूपीएकडून पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याचं वृत्त होतं. हे वृत्त पवारांनी आज फेटाळून लावलं आहे.

पवारांसाठी विरोधकांशी बोलणार?

पीकेंचे ममता बॅनर्जी, जनग रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाल्यास या नेत्यांना एकत्रित आणण्यास पीकेंना काहीही अडचण नसल्याचंही सांगितलं जात होतं. तसेच ओडिशाचे बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांच्याशीही पीके या संदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. काल पीके यांनी काँग्रेसच्या नेत्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यात विविध राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.

दोन तास चर्चा

मंगळवारी पीकेंनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यातून विरोधक एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तब्बल दोन तास त्यांनी राहुल आणि प्रियंका यांच्याशी चर्चा केली. विरोधक एकत्र आल्यास भाजपचा गेम प्लान उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचा 2024च्या निवडणुकीत विरोधकांना फायदाच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (its baseless that i talked with prashant kishore about contesting president election, says sharad pawar)

संबंधित बातम्या:

शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी; वाचा, राहुल गांधींबरोबरच्या बैठकीची इन्साईड स्टोरी

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?, सोनिया गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

आधी शरद पवार, आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?

(its baseless that i talked with prashant kishore about contesting president election, says sharad pawar)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...