जळगाव : भाजपचे अजून 8 नगरसेवक नाराज आहेत. हे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. यापूर्वी 27 नगरसेवक फुटले. त्या गटासोबत हे 8 नगरसेवक फुटून जाणार आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले. खडसेंच्या या दाव्यामुळे जळगाव भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खडसेंचा हा दावा खरा ठरला तर तो भाजप आणि गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का असेल. (Eknath Khadse claims that 8 more corporators of Jalgaon Municipal Corporation are in touch)