रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू : जयंत पाटील

रोहिणी खडसेंना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं (Jayant Patil Rohini Khadse Khewalkar)

रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू : जयंत पाटील
रोहिणी खडसे खेवलकर, जयंत पाटील

जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. जयंत पाटील मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त बोलत होते. जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवारच जाहीर केला. (Jayant Patil assures Rohini Khadse Khewalkar will help her to win)

राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर?

रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं. त्यामुळे एकप्रकारे एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना आमदारकी देण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले.

रोहिणी खडसेंसाठी राष्ट्रवादी पूर्ण ताकद लावणार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काल राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मुक्ताईनगर येथे आले होते. पुढील विधानसभेत रोहिणी खडसे यांना विजयी करण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे.

(Jayant Patil assures Rohini Khadse Khewalkar will help her to win)

रोहिणी खडसेंना पराभवाचा धक्का

रोहिणी खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या साथीनेच त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षप्रवेशासोबतच राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत त्यांनी दिले होते. रोहिणी खडसे या भाजपच्या तिकीटावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या.

एकनाथ खडसेंनी स्वतःसाठी भाजपकडे तिकीट मागितले होते, परंतु भाजपने त्यांचे तिकीट कापत रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली. रोहिणी खडसेंना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना पराभूत केले होते.

संबंधित बातम्या :

जळगावात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; खडसेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

(Jayant Patil assures Rohini Khadse Khewalkar will help her to win)

Published On - 4:04 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI