AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांची गुप्त भेट घेतली?; जयंत पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, तुमच्याकडे…

अनिल देशमुख, राजेश टोपे आणि सुनील भुसारा मी रात्री एक दीड वाजेपर्यंत माझ्या घरात होतो. सकाळी शरद पवार यांच्यासोबत होतो. काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी कुठे गेलो?

अमित शाह यांची गुप्त भेट घेतली?; जयंत पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, तुमच्याकडे...
jayant patil Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2023 | 3:14 PM
Share

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात तासभर खलबतं झाली असून पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. माझी कुणाशीही भेट झाली नाही. भेट झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असा सवाल करतानाच मी काल, आज आणि उद्या शरद पवार यांच्यासोबतच आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी शाह यांना भेटल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्याबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. कुणाशाही माझा संपर्क झालेला नाही. अशा बातम्या पेरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

सुरुवात केली, एंडही करा

बातम्या तुम्हीच तयार केल्या. मी काही सांगितलं का तुम्हाला? तुम्ही रोज काहीही चालवाल आणि त्याला मी रोज सकाळी उठून स्पष्टीकरण द्यायचा का? असा सवाल करतानाच तुम्ही बातम्या दिल्या. तुम्हीच त्याचा एंड करा. मी कुठे गेलो त्याचे पुरावे आहेत का? पुरावे असतील तर त्यावर बातम्या करा. रोज उठून तुम्ही बातम्या करून महाराष्ट्रात गैरसमज केला तर कसं होणार? असा सवाल त्यांनी केला.

मनोरंजन झालं

सकाळापासून माझं मनोरंजन होत आहे. मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी पुण्याला गेलो, अशा सर्व बातम्या येत आहेत. तुम्ही माझं मनोरंजन केलं. चुकीची का होईना पण मला आज प्रसिद्धी मिळाली. ज्यांनी घरात बसून अशा बातम्या तयार केल्या, त्या तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

रात्री दीडपर्यंत घरीच

अनिल देशमुख, राजेश टोपे आणि सुनील भुसारा मी रात्री एक दीड वाजेपर्यंत माझ्या घरात होतो. सकाळी शरद पवार यांच्यासोबत होतो. काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी कुठे गेलो? चर्चा तुम्ही केल्या. तुम्हीच त्याचं उत्तर द्या. मी कुणाला भेटलो असं काही आहे का? तुम्ही परस्पर बातम्या केल्या तर सामान्य कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होईल, असंही ते म्हणाले.

तुम्हाला सांगेल ना

कुणाला भेटायचं असेल तर तुम्हाला सांगेल ना. तुम्हाला सांगूनच जाईल. एका प्रसिद्ध ब्लॉगरने जयंत पाटील भुलले अशी बातमी चालवली. एका चॅनलनेही मी शाह यांना भेटल्याची बातमी चालवली. माझी प्रसिद्धी तुम्ही करताय त्याबद्दल तुमचे आभारच, असा टोला त्यांनी लगावला.

बातम्या पेरणारे तुम्ही

अजित पवार गट, भाजप गट बातम्या पेरतो असं मी म्हणणार नाही. बातम्या पेरणारे तुम्ही. त्यांना बडबडून काही उपयोग नाही. कुणी बातम्या पेरल्या याची माहिती माझ्याकडे नाही, असं सांगतानाच माझा पक्ष मोठा व्हावा हा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी जे करायचं ते मी करतोय, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.