एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी? जयंत पाटील म्हणतात….

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. (NCP Jayant Patil Eknath Khadse )

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी? जयंत पाटील म्हणतात....
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 2:14 PM

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना, खडसेंबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचं सांगितलं. (Jayant Patil’s clarification on the possibility of Eknath Khadses joining the NCP)

जयंत पाटील म्हणाले, “एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली”.

एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला जयंत पाटील यांनी भाजपला दिला. तसंच भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, राजकारणात जर-तरला फार महत्व नसते, असं म्हणत उत्तर देणं टाळलं.

मुंबईत रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक भागात पाणी साचले, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी साचल्याचं जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा 

भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. हा बडा नेता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेच असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. मंत्रिपदावरुन उचलबांगडी केल्यापासून ते विधानसभा आणि विधानपरिषदेचं तिकीट कापण्यापर्यंत, आपली मुस्कटदाबी झाल्याचा खडसेंचा आरोप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरु आहेत. त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अशी चर्चा होत असताना, एकनाथ खडसेंचं नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते.

(Jayant Patil’s clarification on the possibility of Eknath Khadses joining the NCP)

संबंधित बातम्या 

बडा नेता कोण? दुसरं -तिसरं कोणी नाही, खडसेंचीच राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा 

NCP Meeting | जळगावातील भाजप नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राष्ट्रवादीची महत्वाच्या बैठकीत रणनीती 

Non Stop LIVE Update
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.