AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, अशा शब्दात फडणवीसांनी अजितदादांवर निशाणा साधला होता. त्यावर आत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 8:05 PM
Share

पुणे : शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पाणीप्रश्नावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आल्याचं दिसतंय. शुक्रवारी पुण्यात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव न घेता पाण्याच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती. ‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, अशा शब्दात फडणवीसांनी अजितदादांवर निशाणा साधला होता. त्यावर आत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्याच्या पाणी कपातीबाबत महाराष्ट्र सरकारचा किंवा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही. कोणताही विचार झालेला नाही. जे पत्र पालिकेला देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी 11 पत्र देण्यात आली होती. त्यांनी 180 एमएलडी पाणी बंद केलं होतं. असं आमचं धोरण नाही. त्यांनी काल येऊन सांगितलं मात्र पाणी कपातही त्यांनीच केली होती. त्यांनाच पुणेकर धडा शिकवतील. 180 एमएलडी पाणी कपात पुणेकरांना सहन करावी लागली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केलाय.

कोणतीही पाणीकपात होणार नाही, जयंत पाटलांकडून स्पष्ट

पाण्याचा पुनर्वापर व्हावं अशी पत्र दिली आहेत. वापरलेलं पाणी रिसायकलिंग होऊन नदीत सोडलं तर पुढच्या लोकांना फायदा होईल. विनाकारण त्यांनी पुणे शहरातील नागरिकांना भीती दाखवण्याचं काम केलं. निवडणुका आल्या की ते काहीतरी भीती दाखवतात, अशी खोचक टीकाही जयंत पाटील यांनी भाजपवर केलीय. तसंच महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 34 गावांना पाणी कमी पडणार नाही. काही वळण बंधारे बांधून वाया जाणारं पाणी वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कोणतीही कारवाई होणार नाही. कोणतीही पाणीकपात होणार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

फडणवीसांचा अजितदादांना इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी ‘जे पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, असा इशारा काल दिलाय. निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ज्या दिवशी आम्ही शक्ती प्रदर्शन करुन त्या दिवशी आम्हाला एवढी छोटी जागा पुरणार नाही. पुणे महापालिकेत जास्त संख्येनं भाजपचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा करत फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं.

‘महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा, आरपीआयचा निळा झेंडा फडकणार’

मला प्रश्न विचारला की हे शक्तीप्रदर्शन आहे का? मी सांगितलं हे कार्यकर्ते उत्साहानं आले आहेत. आम्ही शक्तीप्रदर्शन करायचं म्हटलं तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा फडकेल. मला अलिकडच्या काळात भाजपचा भगवा सांगावा लागतो. ज्यांना भगव्याचा मान नाही, हिंदुत्ववादी म्हणून घ्यायची लाज वाटते, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय.

इतर बातम्या :

‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही’, जयंत पाटलांचा खोचक टोला

Breaking : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत, पिचड आणि कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप!

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.