AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ सवालाने अजित दादा गटाची दांडी गूल?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला महत्त्वाचा सवाल केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीच वाद नव्हता. पक्षात कधीच दोन गट नव्हते. तसेच शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला अजित पवार यांचं समर्थन होतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार गटाला एक महत्त्वाचा सवाल केला.

जितेंद्र आव्हाड यांच्या 'त्या' सवालाने अजित दादा गटाची दांडी गूल?
ajit pawar and jitendra awhad
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 24, 2023 | 7:44 PM
Share

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगात आज शरद पवार यांच्या गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केल्याची माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षात कधीच वाद नव्हता. तसेच शरद पवार यांनी अध्यक्षपदाला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचं समर्थन होतं. त्यामुळे या सुनावणीला काही अर्थ नाही. ते त्यांच्या स्वार्थासाठी सत्तेत सहभागी झाले आहेत, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.

अगोदरच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र संदर्भात युक्तिवाद केला होतो. शरद पवार यांनी अध्यक्ष होण्यासाठी कोणी प्रस्ताव दिला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी गटाने केला. इंदिरा गांधी आणि ब्रह्मानंद रेड्डी केसप्रमाणे निवडणूक आयोगाने पक्षातील वाद दिसायला हवा. दोन गटात वाद दिसायला हवा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा यांनी राजीनामा परत घ्यायला लावला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा अजित पवार यांनी राजीनामा परत घ्यायला का लावला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“ब्रम्हानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी केसचा संदर्भ घेण्यात आला आहे. वाद हा अचानक होत नसतो. त्याला पार्श्वभूमी असते. मात्र इथे तसं नाही. 1999 नंतर आमचा पक्ष पुढे कसा गेला, याबाबत माहिती दिली. 2020 साली कोरोना होता म्हणून त्यावेळी पक्षात निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर मात्र निवडणूक झाली”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“एका रात्रीत नवरा बायकोला सुद्धा घटस्फोट मिळत नाही. त्यासाठी देखील कलावधी जातो. मग इथ कसं शक्य आहे की एका दिवसांत यांचा वाद झाला? वाद हा पक्षाचा नाही तर सत्तेचा आहे. शरद पवार यांनी कष्टाने पक्ष निर्माण केला आहे. शरद पवारांनी रक्त आटवून पक्ष तयार केला. एखाद्या मुलाप्रमाणे संगोपन केलंय. मग वाद नेमका कुठे झाला. हा वाद पक्षाचा नाही तर सत्तेचा आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच “अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...