राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले, भाजप फार दूर नाही; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा

महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे, सोबतच आम्हाला भाजप काही फार लांब नाही, आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले, भाजप फार दूर नाही; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 10:24 AM

नवी मुंंबई : महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे, सोबतच आम्हाला भाजप काही फार लांब नाही, आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ते नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले आव्हाड? 

आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, ”मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही. आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत. येत्या काळात राज्याती अनेक महत्त्वाच्या शहरातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्येही आघाडी कायम राहिल्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून  जुंपण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरेंचे कौतुक

दरम्यान एकीकडे आव्हाड यांनी गणेश नाईक प्रकरणावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांचे कौतुक देखील केले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. हे पाच वर्ष तर आमचे सरकार स्थिर राहिलच, परंतु  2024 मध्ये देखील पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येईल.  तेव्हा देखील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असे शरद पवार यांनी मला खासगीत सांगितल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Section 144 Imposed in Mumbai : ओमिक्रॉनचा धसका, मोर्चे, आंदोलन, रॅलीला मनाई; मुंबईत कलम 144 लागू

Rupali Chakankar Dance Video : आदिवासी महिलांच्या स्वागतानं रुपाली चाकणकर भारवल्या, पारंपारिक नृत्यावर धरला ठेका

Ali Akbar : बिपीन रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर भडकला, थेट धर्मांतराची घोषणा, हिंदू नावही जाहीर

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.