नवी मुंबईत भाजपला धक्का, बड्या नेत्याचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे प्रवेश

नितीन काळे यांच्या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीत मनसेला अधिक ताकद मिळणार आहे. (BJP Nitin Kale MNS Navi Mumbai)

नवी मुंबईत भाजपला धक्का, बड्या नेत्याचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे प्रवेश
नितीन काळे यांचा मनसे प्रवेश

नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईत मोठा धक्का बसला आहे. कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे (Nitin Kale) यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Navi Mumbai Municipal Corporation Election) मनसेची ताकद वाढणार आहे. (Kalamboli BJP Leader Nitin Kale joins MNS in presence of Raj Thackeray ahead of Navi Mumbai Election)

नितीन काळे यांनी भाजपचा हात सोडून मनसेचे इंजिन चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काळे यांच्यामुळे कळंबोलीत मनसेला अधिक ताकद मिळणार आहे. राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरं महत्त्वपूर्ण मानली जातात.

ठाण्यातही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.

तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला होता. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. (BJP Nitin Kale MNS Navi Mumbai)

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत

गेल्या वर्षी शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

संबंधित बातम्या:

अविनाश जाधवांचा दे धक्का, राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश

पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

(BJP Nitin Kale MNS Navi Mumbai)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI