AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohit Kamboj : सिंचन घोटाळ्याबाबत कंबोज यांचं ट्विट, ‘लवकरच राष्ट्रावादीचा बडा नेता तुरुंगात’; कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे?

आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. त्यांनी सिंचन घोट्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत.

Mohit Kamboj : सिंचन घोटाळ्याबाबत कंबोज यांचं ट्विट, 'लवकरच राष्ट्रावादीचा बडा नेता तुरुंगात'; कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे?
मोहित कंबोज Image Credit source: TV9
| Updated on: Aug 17, 2022 | 12:08 PM
Share

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. त्यांनी सिंचन घोट्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत. आपण पत्रकार परिषद घेऊन लवकरच राष्ट्रवादीच्या (NCP) बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा रोख हा राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत या चार जणांची नावं आहेत. पाचवी जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.  तसेच ‘आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के’ असं देखील त्यांनी म्हटले आहे. यामध्ये आम्ही ज्यांच्यावर आरोप करतो ते शंभर टक्के तुरुंगात जातात असेच कंबोज यांना सुचवायचे आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनापेक्षाही अधिक चर्चा आज कंबोज यांच्याच ट्विटची सुरू आहे.

नेमकं काय म्हटलंय कंबोज यांनी?

कंबोज यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये चार जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत, संजय पांडे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी पाचवी जागा रिक्त ठेवली आहे. तसेच आमचा स्ट्रईक रेट 100 टक्के असं कंबोज यांनी म्हटलं आहे. आम्ही ज्यांच्यावर आरोप करतो त्यांच्यावर कारवाई होतेच असं कंबोज यांना सुचवायचं आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कंबोज यांचा संपूर्ण रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

अमोल मिटकरींचा कंबोज यांच्यावर निशाणा

दरम्यान दुसरीकडे मोहित कंबोज यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  कंबोज हे भाजपाचा भोंगा असल्याची टीका त्यांनी केली आहे.  हनुमान चालीसाच्यावेळी कंबोज यांनी लोकांना भोंगे पुरवले. मात्र जीएसटी, महागाई, वाढत असलेले दर यावरून ते एकही शद्ब बोलत नसल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे. तसेच कोणत्या नेत्याची चौकशी होणार आहे, हे कंबोज यांना कसे माहित होते याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Follow Us
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?