कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या; लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी, संजय राऊत भडकले

संजय राऊत यांनी कंगना रनौत  आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंगनाने देशाची माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या; लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी, संजय राऊत भडकले
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 10:26 AM

मुंबई –  संजय राऊत यांनी कंगना रनौत  आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली  स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात संजय राऊत यांनी देखील उडी घेतली असून, कंगनाच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपाने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे राऊत यांनी म्हटले. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

 ईडी, सीबीआय भाजपाचे नोकर 

दरम्यान सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावरून देखील त्यांनी केंद्राला टोला लगावला आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सीबीआय, इडी, आयकर विभाग अशा पद्धतीने धाडी टाकत आहेत, जसे की ते भाजपाचे नोकर असावेत. मात्र परिस्थिती बदलनार 2024 नंतर हेच शस्त्र तुमच्यावर उलटणार, सध्या राज्यात काय सुरू आहे हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. 2024 जनता तुम्हाला तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी नवाब मलिक यांची देखील पाठराखन केली. मलिक यांना मुख्यमंत्र्यांनी पाठिंब दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे, त्यामुळे या लढाईत मलिक एकटे नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाली होती कंगना ?

”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली  स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. भाजपा नेते वरून गांधी यांनी देखील कंगनावर टीका केली आहे.  कंगनाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की,  “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान होतो, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर होतो, आतातर शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार होतोय. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?”, असा घणाघात त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या 

महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार; मुंबईत येताच नड्डांचा हुंकार

पिकांचे भाव माहित नाहीत; गांजा किती रुपयांना मिळतो हे बरोबर ठावूक असते, विखेंचा मलिकांवर निशाणा

राज्यात ‘बिगबॉस’चा शो; ड्रग्स प्रकरणावरून सरकारवर पंकजा मुंडेची टीका, फडणवीसांनाही लगावला अप्रत्यक्ष टोला

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.