मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा

कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा आपल्या मालकीचा असल्याचा दावा करून केंद्र सरकारने या जागेवर फलक लावल्याने दिवसभर आरोप-प्रत्यारोपचा राजकीय धुरळा उडालेला असतानाच त्यात आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उडी घेतली आहे.

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 7:57 PM

मुंबई: कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा (metro car shed) आपल्या मालकीचा असल्याचा दावा करून केंद्र सरकारने या जागेवर फलक लावल्याने दिवसभर आरोप-प्रत्यारोपचा राजकीय धुरळा उडालेला असतानाच त्यात आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा आदित्य ठाकरे (aditya thackeray ) यांनी केला आहे. (aditya thackeray reaction on metro car shed)

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून हा दावा केला आहे. महसुली नोंदीनुसार कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे. जिल्हाधिकाऱ्याने ही जागा एमएमआरडीएला कारशेड डेपो तयार करण्यासाठी दिली आहे. तशी नोंदच महसूल विभागाच्या खात्यात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जागा एमएमआरडीएला देण्यात आल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या जागेवर दावा केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी राजकीय प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, आता आदित्य ठाकरे यांनी डिटेल माहिती दिल्याने त्यावर भाजप काय प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. (aditya thackeray reaction on metro car shed)

संबंधित बातम्या:

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

‘मेट्रो’वरुन राजकारण तापले; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने लावला बोर्ड

(aditya thackeray reaction on metro car shed)

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.