केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार, कपिल पाटलांची ठाणेकरांना ग्वाही

नव्या जबाबदारीचा उपयोग ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यावर माझा भर असेल. या मंत्रिपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केले. कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेस ठाणे शहरातून प्रारंभ झाला, या प्रसंगी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार, कपिल पाटलांची ठाणेकरांना ग्वाही
कपिल पाटील, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 11:55 PM

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवलेल्या नव्या जबाबदारीचा उपयोग ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यावर माझा भर असेल. या मंत्रिपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केले. कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेस ठाणे शहरातून प्रारंभ झाला, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी या यात्रेचे संयोजक आमदार संजय केळकर, ठाणे शहर अध्यक्ष आ. निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, संजीव नाईक, कृपाशंकर सिंग, नगरसेवक भरत चव्हाण आदी उपस्थित होते. (Kapil Patil assures that development of Thane district will be accelerated)

कपिल पाटील म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळणे हे प्रत्येक ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ही जबाबदारी सांभाळताना जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे. यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी मोठ्या उत्साहाने या यात्रेचे स्वागत करून ना. पाटील यांना आशीर्वाद दिले. यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व या भागांना भेटी दिल्या. उद्या मंगळवार 17 ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांवरुन महाविकास आघाडीवर निशाणा

कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा आज ठाणे जिल्ह्यातून सुरु झाली. त्यानंतर आजच्या यात्रेची सांगता कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात झाली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी रस्त्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आपण ज्या कल्याण शीळ रस्त्यावरुन यात्रा केली. त्या रस्त्याची काय अवस्था आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना कल्याण-शीळ रस्त्याचं काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. त्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या कामाची चौकशी केली जाईल, असं पाटील यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर शहापूर-कर्जत हायवे या रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.

मनसे, सेना पदाधिकाऱ्यांकडून पाटील यांचं स्वागत

मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेत पाटील यांचं स्वागत केलं. याविषयी पाटील यांनी सांगितलं की, राजू पाटील यांच्याशी माझे घरचे संबंध आहे. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ते सदस्य होते. ज्याला कोणाला मला आशीर्वाद द्यायचा आहे, ते आशीर्वाद देऊ शकतात. त्याला पक्षाच्या चौकटीत बांधणे योग्य होणार नाही, असं पाटील यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांवरुन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा

मराठा आरक्षणावर चॅनेल्ससमोर चर्चा होऊनच जाऊ द्या; चंद्रकांतदादांनी आघाडीला ललकारले

Kapil Patil assures that development of Thane district will be accelerated

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.