AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार म्हणजे पक्ष नाही, पक्षाचा सदस्य हा… सिब्बल यांनी मांडला टेक्निकल मुद्दा; सुनावणीत नियम सांगितला!

Shiv Sena Case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आमदार अपात्रतेच्या मुद्यावर सिब्बल यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, त्याची माहिती जाणून घेऊयात.

आमदार म्हणजे पक्ष नाही, पक्षाचा सदस्य हा... सिब्बल यांनी मांडला टेक्निकल मुद्दा; सुनावणीत नियम सांगितला!
Shivsena Case NewsImage Credit source: Google
| Updated on: Aug 18, 2026 | 5:17 PM
Share

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं? याबाबत सुनावणी पार पडली. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आमदार अपात्रतेच्या मुद्यावर सिब्बल यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. यात त्यांनी परिच्छेद 10/1 ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण ते पक्ष नसतात या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. सिब्बल यांनी युक्तिवादात नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

आमदार पक्षाचे असतात पण ते पक्ष नसतात – सिब्बल

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा कसा वेगळा आहे यावर भर दिला. सिब्बल यांनी म्हटले की, आमदार पक्षाचे असतात पण ते पक्ष नसतात. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. परिच्छेद 10/1 ब मध्ये राजकीय पक्षाचा सदस्य आणि विधीमंडळ पक्षाचा सदस्य यांच्यात फरक करण्यात आलेला आहे. पण सध्या विधीमंडळ पक्षाचे सदस्यच राजकीय पक्ष बनले आहेत. ते दहाव्या अनुसूचीला अमान्य आहे. विधानसभा अध्यक्षांनी निष्कर्षातून ही परिस्थिती मान्य केली आहे असं म्हणत सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कपिल सिब्बल यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधताना सांगितले की, राजकीय पक्षाच्या तिकीटावर आमदार निवडून येतात. ज्या राजकीय पक्षाच्या तिकीटावर आमदार निवडून येतात, त्या पक्षाच्या आदेशाला आमदारांनी बांधील राहिलं पाहिजे, असं दहावी अनुसूची सांगते. मात्र विधानसभा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहाव्या अनुसूचीला अमान्य असणारी गोष्ट मान्य केली आहे.

बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करु शकत नाहीत

पुढे बोलताना सिब्बल यांनी म्हटले की, 1999 ची घटना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. अध्यक्षांनी निर्णय देताना फुटीआधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही? जेव्हा पक्षात फूट पडते आणि दोन्ही गट 2018 च्या संविधानाचा दाखला देत होते त्यावेळी पक्षाचं आधीचं संविधान वापरायला पाहिजे होतं. प्रतोद आमच्या बाजूनं होता. व्हीप आम्ही जारी केला होता. त्यामुळे बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करु शकत नाहीत कारण त्यांनी व्हीपविरोधात मतदान केलं असंही सिब्बल यांनी म्हटलं.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात