AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : राष्ट्रपतींच्या शपथ सोहळ्यात शाकाहारीच भोजन ठेवा; पुण्यातून ई-मेलद्वारे आग्रह

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी म्हणजे देशभरातील राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून जगभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या स्नेहभोजनात जर शुद्ध शाकाहारी पदार्थाची मेजावानी राहिली तर शाकाहारीचे महत्व सर्वांच्याच लक्षात येणार आहे.

Pune : राष्ट्रपतींच्या शपथ सोहळ्यात शाकाहारीच भोजन ठेवा; पुण्यातून ई-मेलद्वारे आग्रह
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Image Credit source: tv9 marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 22, 2022 | 3:41 PM
Share

पुणे : पुणे तिथे काय उणे…ही म्हणीला अगदी तंतोतंत कृत्यही पुणेकरांनी केलेले आहेत. त्यामुळे याला विशेष महत्वही आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे हे पुणेकरांचे वैशिष्ट राहिलेले आहे. आता (The President ) राष्ट्रपतींच्या शपथविधीवरुन पुणे चर्चेत आले आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून (Draupadi Murmu) द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. त्यामुळे 25 जुलै रोजी (Swearing-in ceremony) शपथग्रहण सोहळा पार पडत आहे. नवनियुक्त नियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या अध्यात्मिक आहेत तर त्या शुध्द शाकाहारी देखील असून या सोहळ्यात स्नेहभोजन हे शुद्ध शाकाहारी असावे अशी मागणीच शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. त्यामुळे या अनोख्या मागणीची खमंग चर्चा आता रंगू लागली आहे. यासंदर्भात गंगवाल यांनी संबंधित विभागांना मेलही केले आहेत.

शाकाहाराचे महत्व जगाला कळेल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी म्हणजे देशभरातील राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून जगभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या स्नेहभोजनात जर शुद्ध शाकाहारी पदार्थाची मेजावानी राहिली तर शाकाहारीचे महत्व सर्वांच्याच लक्षात येणार आहे. भारतीय शाकाहाराची जगभर माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे निमित्त राहणार आहेत. शिवाय भारतीय खाद्य संस्कृतीचेही दर्शन घडेल असा विश्वास शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना आहे. त्यामुळे त्यांनी पत्रव्यवहार तर केला आहे. त्यावर काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

नेमका आग्रह कशामुळे?

भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून काल द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील महिलेची निवड ही सर्वोच्चपदी झाली आहे. द्रौपदी मुर्मू या अध्यात्मिक आहेत. शिवाय त्या मंसाहार करीत नसून शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यात केवळ शाकाहारीच असेच जेवण ठेवावे अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणीवर काय निर्णय होणार हे आता पहावे लागणार आहे.

25 जुलै रोजी शपथग्रहन सोहळा

राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी निवडीचा निकाल लागला असून आता 25 जुलै रोजी शपथग्रहन सोहळा होत आहे. त्याअनुशंगाने परदेशातील पाहुणे आणि देशभरातून राजकीय नेते हे उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान, सर्व उपस्थितांसाठी शाकाहारच जेवण करण्याची मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली तर ते एक शाकाहाराचे पुरस्कर्ते आहेत.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?