Kirit Somaiya in Delhi : स्पेशल टीम पाठवून हल्ल्याची चौकशी करा; सोमय्यांसह भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला

किरीट सोमय्या यांनी स्पेशल टीम पाठवून हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांच्या मदतीनं हल्ला केला गेला, असा आरोप त्यांनी पुन्हा केलाय. संजय पांडे यांचं निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Kirit Somaiya in Delhi : स्पेशल टीम पाठवून हल्ल्याची चौकशी करा; सोमय्यांसह भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला
किरीट सोमय्या.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:12 AM

नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपचं (BJP) शिष्टमंडळ आज दिल्लात दाखल झालं. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणाची दाद मागायला हे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचलं आहे. सोमय्यांसह भाजप आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. किरीट सोमय्या यांनी स्पेशल टीम पाठवून हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांच्या (Police) मदतीनं हल्ला केला गेला, असा आरोप त्यांनी पुन्हा केलाय. संजय पांडे यांचं निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली.खोटी एफआयआर (FIR) कुणाच्या सांगण्यावरुन करण्यात आली, याची चौकशी करा, अशीही मागणी सोमय्यांनी केली आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावं लागलं. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या यांनाही जखमा झाल्या. त्याच्या हनुवटीतून रक्त वाहत होतं. तर त्यांच्या शेजारी बसलेल्याला माणसाच्या हातातही तुटलेल्या खिडकीच्या काचा घुसल्या. या हल्ल्यानंतर आता किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. मला जीवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

सोमय्या काय म्हणाले?

दिल्लीत पोहचलेले सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात कमांडोंना मारलं जातं. त्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला जातो. ही उद्धव ठाकरे सरकारच्या उद्धटगिरींची हद्द आहे. त्यामुळे आम्ही स्पेशल टीम पाठवायचा आग्रह करणार आहोत. पोलिसांच्या मदतीने हल्ला केला जातोय.

पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग

सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रात पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग केला जातोय. त्यात पोलीस कमिशनर संजय पांडे सुद्धा सहभागी आहेत. त्यांनी माझ्या नावावर खोटा एफआयआर लिहायला लावला. तीन ठिकाणी कमांडरवर हल्ला झाला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रकक्ता आम्हाला 20 फूट जमिनीत गाढू म्हणतो. ही सगळी माहिती आम्ही देणार आहोत. या कारणामुळे आम्ही स्पेशल टीम पाठवायची मागणी करणार आहेत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Non Stop LIVE Update
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.