लव्ह जिहादवरून घूमजाव, 'शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग'; 'सामना' अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांचा हल्लाबोल

सामना अग्रलेखाचा दाखला देत किरीट सोमय्या यांनी 'शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग', असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलंय.

लव्ह जिहादवरून घूमजाव, 'शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग'; 'सामना' अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांचा हल्लाबोल

मुंबई :  उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (UP Yogi Adityanath Govt) सरकारने लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. अशावेळी महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने (Thackeray Govt) लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी केली. तसंच सामना अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांनी ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’, असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलंय. (Kirit Somaiya Slam Cm Uddhav thackeray Over Samana Editorial Love jihad)

“10 सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठींबा आहे. तर 21 नोव्हेंबरचा सामना म्हणतो लव्ह जिहादमध्ये गैर काय आहे? यावरुन शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग दिसून येतोय”, अशी खरमरीत टीका सोमय्या यांनी केली आहे.

“युपी सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे, त्यांचं आम्ही समर्थन करतो. यूपीसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शिवसेनेने सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. “लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा आहे. शेवटी लग्न करताना मुलगा आणि मुलीची पसंती महत्त्वाची असते. मात्र, भाजप यावरुन केवळ राजकारण करू पाहत आहे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला टार्गेट केलं. “सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा रंग बदलला. अस्लम शेख लव्ह जिहादवर जी भाषा बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात”, अशी टीका सोमय्यांनी केली. यूपी सरकारने केलेल्या कायद्यानुसार महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा. विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले.

(Kirit Somaiya Slam Cm Uddhav thackeray Over Samana Editorial Love jihad)

संबंधित बातम्या

‘लव्ह जिहाद’ हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर

उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याच्या तयारीत, देश तोडण्याचा डाव, काँग्रेसचा निशाणा

‘लव्ह-जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *